Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र Tax Raid: सर्वात मोठी कारवाई; नाशिकमध्ये आयकर छाप्यात 3333 कोटींचे बेहिशेबी व्यवहार

Tax Raid: सर्वात मोठी कारवाई; नाशिकमध्ये आयकर छाप्यात 3333 कोटींचे बेहिशेबी व्यवहार

Subscribe

नाशिक शहर व परिसरातील सात बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकाने गेले सहा दिवस छापे टाकले. मगंळवारी ही कारवाई संपली. यात तब्बल 3 हजार 333 कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले आहेत.

नाशिक शहर व परिसरातील सात बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकाने गेले सहा दिवस छापे टाकले. मगंळवारी ही कारवाई संपली. यात तब्बल 3 हजार 333 कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले आहेत. तर साडेपाच कोटींची रोकड आणि दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे. (Tax Raid Biggest Action in the State 3 thousand 333 crore unaccounted transactions of builders in income tax raid in Nashik )

नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे व मुंबई, नागपूर कार्यालयातील 225 अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक दिवस-रात्र ही कारवाई करत होते. 90 हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांनी बांधकाम व्यावसायिकांची 40 ते 45 कार्यालये, बंगले, फार्म हाऊस याठिकाणी छापे टाकले.

- Advertisement -

20 एप्रिलला पहाटे सहा वाजेच्या सुमारास सुरु झालेली कारवाई 25 एप्रिलपर्यत चालली. या छाप्यामध्ये आयकर विभागाच्या हाती मोठी मालमत्ता लागण्याची शक्यताही वर्तवली जात होती. शहरात अनेक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरु आहेत. त्यात कागदावर अतिशय कमी उलाढाल दाखवून करचुकवेगिरी केल्याचा संशय आयकर विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

( हेही वाचा: उष्मघातामुळे वाहतूक पोलिसांची खबरदारी, ५५ वर्षांवरील पोलिसांसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना )

बांधकाम क्षेत्रात खळबळ

- Advertisement -

आयकर विभागाच्या छाप्यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अचानक हे छापे पडले. हे सर्व अधिकारी नाशिक, छत्रपती संभाजी नगर, पुणे, मुंबई येथील असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच शहरातील अत्यंत नामांकित बांधकाम व्यावसायिक या छाप्यांमध्ये लक्ष करण्यात आले आहेत. हे छापे नक्की कशासाठी टाकण्यात आले, आयकर चोरी की अघोषित संपत्ती की अन्य काही हे अद्याप समजू शकलेले नाही. एप्रिल महिन्यात हे छापे पडल्याने आयकर चोरीचा संशय? अघोषित संपत्ती? की इतर काही कारणे आहेत. याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं असून या छापेमारीत आता काय समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -