मुंबई – सीएनजीच्या किमती वाढत असताना टॅक्सी रिक्षाचालकांनीही आता दर वाढवले आहेत. आज, १ ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. ऑटो रिक्षाच्या भाड्यात दोन रुपयांनी तर, टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे टॅक्सीने प्रवास करताना किमान २८ रुपये आणि रिक्षाने प्रवास करताना किमान २३ रुपये मोजावे लागणार आहेत.
हेही वाचा– दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किमती घसरल्या, जाणून घ्या आजचे दर
सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने भाडेवाढ करण्याची मागणी टॅक्सी युनियन संघटनेने राज्य सरकारकडे केली होती. त्या मागणीचा गांभीर्याने विचार करत सरकारने भाडेवाढीला मंजुरी दिली. यामुळे यनियन संघटनांनीही आनंद व्यक्त केला आहे. परंतु, सरकारच्या या निर्णयावर प्रवासी नाखूष आहेत.