घरताज्या घडामोडीपावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला होणारा सरकारी चहापानाचा कार्यक्रम रद्द

पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला होणारा सरकारी चहापानाचा कार्यक्रम रद्द

Subscribe

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केला जाणारा चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील संवादाची प्रथा खंडित होणार आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. याआधी कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारला अधिवेशन दोन वेळा पुढे ढकलावे लागले होते. राज्यात करोनाचे संकट गंभीर बनल्याने पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसाचे होईल.

अधिवेशनाचे कामकाज आटोपशीर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेधी सूचना होणार नाहीत. अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि शासकीय विधेयके मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत. ७ सप्टेंबरला पहिल्या दिवशी अध्यादेश पटलावर ठेवण्यात येतील. तसेच सन २०२०-२१ या वर्षाच्या पुरवणी मागण्या आणि ११ शासकीय विधेयके सादर करण्यात येतील. याशिवाय माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर, माजी विधानसभा सदस्य अनिल राठोड, सुधाकर परिचारक, हरिभाऊ जावळे, सदाशिवराव ठाकरे, रामरतन राऊत, चांद्रकांता गोयल आदींच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

- Advertisement -

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या तोडांवरच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यामुळे ते या दोन दिवसांच्या अधिवेशनाला मुकणार आहेत. त्यांच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अधिवेशनाचे कामकाज पुढे नेतील. नाना पटोले हे त्यांच्या मतदारसंघात पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरे करत होते, त्यावेळी त्यांना लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घेतली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी ट्विटरवर स्वतः याबाबत माहिती दिली होती.

- Advertisement -

दरम्यान आज विधीमंडळाच्या आवारात कर्मचारी, सुरक्षा रक्षक, आमदार, मंत्री यांचे पीए, वार्तांकन करणारे पत्रकार यांची कोरोना चाचणीसाठी नमुने गोळा करण्यात आले. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येणार आहे, त्यांनाचा विधीमंडळांच्या प्रांगणात प्रवेश दिला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -