ठाण्यातील मदरशात अल्पवयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण; शिक्षक फरार

हा व्हिडीओ वायरल होताच दिनी मदरशा प्रशासनाने निजामपुरा पोलीस ठाण्यात नुरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर मारहाण करणारा शिक्षक फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

संग्रहित छायाचित्र

ठाणेः भिवंडी येथील एका मदशात शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याला काठीने २३ सेकंदात २६ फटके मारले. गेल्या वर्षी ही घटना घडली. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल झाल आहे. त्याची दखल घेत मदरशा प्रशासनानेच संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

शिक्षकाने विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला होता. मात्र मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही. त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली. गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर २०२२ रोजी ही घटना घडली. भिवंडी येथील दीनी मदरशात ही घटना घडली. येथे फहाद भगत नुरी हे शिक्षक आहेत. ते मुळचे गुजरातचे आहेत. १४ वर्षीय मुलगा नेहमीप्रमाणे मदरशात गेला. नुरी यांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला होता. मात्र त्या विद्यार्थ्याला गृहपाठ नीट करता आला नाही. त्यामुळे नुरी यांनी त्या विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला.

हा व्हिडीओ वायरल होताच दिनी मदरशा प्रशासनाने निजामपुरा पोलीस ठाण्यात नुरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर मारहाण करणारा शिक्षक फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांना फटकारणे, शिक्षा करणे हा गुन्हा होत नाही, असा निर्वाळा नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या शिक्षेचा आदेश रद्द करताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या शिक्षकावर आपल्या शाळेतील दोन मुलांना काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी या शिक्षकाला एका दिवसाची पोलीस कोठडी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

प्राथमिक शाळांमध्ये घडणाऱ्या या घटना सामान्य आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकांना काहीवेळा थोडे कठोर व्हावे लागते. त्यामुळे हा काही गुन्हा नाही. विद्यार्थ्यांना शाळेत यासाठीच पाठवले जाते कारण त्यांच्या जीवनात त्यांना शिस्त लागली पाहिजे. जीवनातील आचरणांबद्दल त्यांना माहिती झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा उद्देश केवळ त्यांना शैक्षणिक माहिती मिळणे नाही तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी त्यांना शिस्त लावणे देखील महत्वाचे आहे. ज्यामुळे ते भविष्यात चांगले व्यक्ती बनतील, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.