घरताज्या घडामोडीटीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश, ७८८० उमेदवारांचा परीक्षेतील घोटाळ्यात सहभाग

टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश, ७८८० उमेदवारांचा परीक्षेतील घोटाळ्यात सहभाग

Subscribe

टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणातील २९३ उमेदवारांवर कारवाई केली जाणार असून ७८८० उमेदवारांचा परीक्षेतील घोटाळ्यात सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे. शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२०२० च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या परिपत्रकानुसार, या गैरप्रकाराच्या तपासादरम्यान परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ७८८० उमेदवार परीक्षेतील गैरप्रकारात सामिल आहेत. याप्रकरणातील अनेक उमेदवारांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिनियम १९९८ भाग २ प्रकरण ५ मधील कलम ८ उपनियम (२) (य) मध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दोषी उमेदवारांवर शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

२९३ उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. तर उर्वरित ८७ उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा २०१९चा अंतिम निकाल २८ ऑगस्ट २०२० रोजी परीक्षा परिषदेच्या स्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता. त्यानुसार एकूण १६७०५ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी अनेक उमेदवार गैरप्रकारामध्ये समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले होते.

दरम्यान, गैरप्रकारामध्ये सहभागी असलेले परीक्षार्थींंच्या विरोधात परीक्षा परिषदेने निश्चित केलेले आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि https://mahatet.in या स्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आम्ही शांत आहोत, पण..; सामंतांवरील हल्ल्यानंतर गुलाबराव पाटलांचा इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -