घरCORONA UPDATEशिक्षकांना हवे विमा कवच; शिक्षण विभागाकडे शिक्षकांची मागणी

शिक्षकांना हवे विमा कवच; शिक्षण विभागाकडे शिक्षकांची मागणी

Subscribe

कोरोनाच्या कामासाठी नेमणूक करण्यात येणाऱ्या शिक्षकांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शिक्षण विभागाने अनुदानित शाळांकडून शिक्षकांची माहिती मागवली आहे. यापूर्वीही मुंबई महापालिकेमध्ये आपल्या शाळेतील शिक्षकांची माहिती संकलित केली आहे. कोरोनाच्या कामासाठी नेमणूक करण्यात येणाऱ्या शिक्षकांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शिक्षण विभागाने शिक्षकांच्या सेवा कोरोनासंबंधी विविध कामे करण्यासाठी घेण्याचे ठरवले आहे. यासाठी शाळांमार्फत शिक्षकांची संकलित करण्यात येत आहे. राज्यातील अनेक पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेक पोलिसांचे बळी गेले आहेत.

डॉक्टर, नर्स, व वैद्यकीय क्षैत्रातील कर्मचारी सेवा करताना कोरोनाबाधित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने या कामासाठी नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट, वाहतूक सुविधा, तसेच विमा कवच देण्याची व्यवस्था करावी अशी, मागणी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शिक्षक उदय नरे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. शिक्षक कोरोनाच्या कामासाठी एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सेवा देण्यास तयार आहेत. परंतु सरकारने शिक्षकांसाठी योग्य त्या आरोग्य सुविधा देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशीही मागणी नरे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -