घरCORONA UPDATELockDown : शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी!

LockDown : शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी!

Subscribe

सध्या राज्यातील सर्वच शाळा लॉकडाऊनमुळे बंद असल्याने व २ मे पासून शाळांना अधिकृत उन्हाळी सुट्ट्या लागणार असल्यामुळे इतर जिल्ह्यातील शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी.

राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये अन्य जिल्ह्यातील अनेक शिक्षक कार्यरत आहेत. सध्या राज्यातील सर्वच शाळा लॉकडाऊनमुळे बंद असल्याने व २ मे पासून शाळांना अधिकृत उन्हाळी सुट्ट्या लागणार असल्यामुळे इतर जिल्ह्यातील शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना करण्यात आली आहे. 

३५ दिवसापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद आहेत. २ मे पासून राज्यातील सर्वच शाळांना अधिकृतरित्या उन्हाळी सुट्टी लागणार आहे. सुट्ट्या लागल्यानंतरही  लॉकडाऊनमुळे सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या असल्याने अन्य जिल्ह्यातील शिक्षकांना आपल्या जिल्ह्यात जाता येत नाही. ते आपल्या गावापासून व कुटुंबापासून दूरच राहणार आहेत तरी राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर पालिका व संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षकांना आपल्या नोकरीच्या कार्यरत जिल्ह्यातून त्यांच्या मुळ गावी जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -