घरमहाराष्ट्रशिक्षकांना आता कोविड-१९चे १५ दिवसच काम करावं लागणार

शिक्षकांना आता कोविड-१९चे १५ दिवसच काम करावं लागणार

Subscribe

महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश

कोविड-१९ च्या उपाययोजनांच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असली तरी कोविड केअर सेंटर, कंटेनमेंट झोन किंवा महापालिकेच्या वॉर रुममध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना केवळ १५ दिवसांचीच सेवा घेण्यात यावी,अशा प्रकारचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावले आहे. १५ दिवसांच्या सेवेनंतर दुसऱ्या शिक्षकांची पुढील १५ दिवसांकरता नियुक्ती करून त्या सर्वांची आळीपाळीने सेवा घेण्यात यावी,असे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले. शिक्षकाचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी या सूचना जारी केल्या आहेत.

bmc

- Advertisement -

मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी २९ जून रोजी २४ विभाग कार्यालयांच्या शालेय प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक परिपत्रक जारी करून या सूचना दिल्या आहे. त्यामध्ये त्यांनी कोविड १९ सेंटर, कोविड केअर सेंटर, कंटेन्मेंट झोन याठिकाणी मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी नियमितपणे त्यांची सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्याची प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १५ दिवसांपर्यंत कोविड १९चे कामकाज देण्यात यावे. १५ दिवसांनंतर त्यांच्याऐवजी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. अशाप्रकारे कोविड १९ च्या कामासाठी १५-१५ दिवसांसाठी आळीपाळीने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून कोविडच्या कामासाठी नियुक्त केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा भार पडणार नाही व त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होणार नाही,असे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -