घर महाराष्ट्र आई उपोषणस्थळी आल्यानं जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू; माझ्या बाळाला न्याय द्या, मातेचं आवाहन

आई उपोषणस्थळी आल्यानं जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू; माझ्या बाळाला न्याय द्या, मातेचं आवाहन

Subscribe

मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे 11 दिवसांपासून उपोषण करत आहेत. आज, शुक्रवारी जरांगे पाटील यांच्या आईने त्यांची भेट घेतली. यावेळी आईला पाहताच ते हळवे झाले. आईशी बोलताना कंठ फुटत नव्हता . त्यांनी त्याच स्थितीत मराठ्यांची मान झूकू न देण्याचा संकल्प केला. माय-लेकांनी ही भेट पाहून उपोषणस्थळी उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले

मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे 11 दिवसांपासून उपोषण करत आहेत. आज, शुक्रवारी जरांगे पाटील यांच्या आईने त्यांची भेट घेतली. यावेळी आईला पाहताच ते हळवे झाले. आईशी बोलताना कंठ फुटत नव्हता . त्यांनी त्याच स्थितीत मराठ्यांची मान झूकू न देण्याचा संकल्प केला. माय-लेकांनी ही भेट पाहून उपोषणस्थळी उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले…

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात जालन्याच्या आंतरवाली सराटीत गत 11 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. गत 2 दिवसांपासून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांना बोलतानाही त्रास होत आहे. त्यानंतरही त्यांनी मराठा आरक्षण किवंवा अंत्ययात्रा असा निर्वाणीचा इशारा सरकारला दिला आहे. (Tears in Manoj Jarange Patil s eyes as his mother came to the hunger strike Give justice to my Child a mother s appeal )

आईचं भावनिक आवाहन…

- Advertisement -

आपल्या मुलाची प्रकृती ढासळल्याची माहिती मिळताच मनोज जरांगे पाटील यांच्या आई प्रभावती यांनी उपोषण स्थळाकडे धाव घेतली. आपल्या आईला उपोषण स्थळी येताना पाहून जरांगे यांनी उपोषण स्थळाकडे धाव घेतली. आपल्या आईला उपोषण स्थळी येताना पाहून जरांगे पाटील यांचे मन हेलावले. काळजात एकच कालवाकालव सुरू झाली. त्यांनी आई जवळ येताच त्यांच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेतलं. त्यानंतर आईला घट्ट मिठी मारली. यावेळी दोघेही भावूक झाले…

आईच्या भेटीनंतर जरांगे पाटलांनी पुन्हा आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्यांना कंठही फूटत नव्हता.

- Advertisement -

दुसरीकडे, जरांगे यांच्या मातोश्रींनी यावेळी सरकारला आपल्या बाळाला न्याय देण्याची विनंती केली. तसंच, समाजालाही आपल्या मुलाच्या पाठिशी ठामपणए उभं राहण्याचं आवाहन केलं. मराठा समाजाला आरक्षण द्या. माझ्या बाळाला न्याय द्या, असं त्या म्हणाल्या.

मराठ्यांची मान झूकू देणार नाही

जरांगे पाटील म्हणाले की, मी माझ्या समाजाचं, या गावाचं, जन्मभूमीचं भलं करण्यासाठी माझा जीव पणाला लावला. पुढच्या काळातही लावणार आहे. आज माझ्यासाठी मराठा समाज घराघरातून पेटून उठला आहे. जर न्याय आणि दान द्यायचं असेल तर मराठा पोरांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे.

मराठ्यांची मान खाली न झुकू देण्याचा शब्द देतो. माझ्या गावासह संपूर्ण महाराष्ट्र माझ्या मागे उभा आहे. त्याचा अभिमान आहे, असंही ते म्हणाले. हे बोलताना जरांगे पाटलांच्या आई त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसत होत्या.

(हेही वाचा: राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नीलम गोऱ्हेंची विठ्ठुरायाच्या चरणी प्रार्थना )

- Advertisment -