Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र गुढीपाडवा मेळावा : मनसेचा जबरदस्त टीजर प्रदर्शित, राज ठाकरे कोणता मुद्दा मांडणार?

गुढीपाडवा मेळावा : मनसेचा जबरदस्त टीजर प्रदर्शित, राज ठाकरे कोणता मुद्दा मांडणार?

Subscribe

MNS Melava | यंदा,२ २ मार्च रोजी गुढीपाडवा आहे. सकाळी राज्यभरातील विविध शहरातून शोभायात्रा निघेल. तर, सायंकाळी ६ वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून ते जाहीर सभा घेणार आहेत.

MNS Melava | मुंबई – हिंदू नववर्षाचं स्वागत करताना विचारांची आदान-प्रदान करण्याकरता आणि सत्ताधारी व विरोधकांना आव्हान देण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यंदाही शिवाजी पार्कवरून महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करणार आहेत. गेल्यावर्षी भोंग्याचा विषय याच पाडवा मेळाव्यातून गाजला होता. त्यामुळे यंदा कोणत्या मुद्द्यावरून ते राज्याच्या जनतेला संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या मेळाव्याचा टीजर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ओहोटी कधीही लागू शकते; राज ठाकरेंचा भाजपला इशारा

- Advertisement -

“हिंदू ही दोन अक्षरं जगा, मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा. राज ठाकरे ही पाच अक्षर नेहमीच पाठीशी असतील,” अशा लिखित वाक्यांनी या टीझरची सुरुवात झाली आहे. तर, पाठीमागून राज ठाकरेंचे एक भाषणही ऐकू येत आहे. ‘माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन, माझ्या धर्माला कुणी नख लावायचा प्रयत्न केला, तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन,’ असं राज ठाकरेंच्या आवाजातील वाक्यही या टीजरमध्ये आहे. तर, ‘ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व,’ असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

शिवसेनेकडून दसऱ्यादिवशी मेळावा घेतला जातो. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गुढीपाडव्याला मेळावा घेण्याची प्रथा आहे. या दोन्ही दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला विचारांचं खाद्य मिळतं. राज ठाकरेंची वक्तृत्त्व शैली अवघ्या महाराष्ट्राला प्रिय आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. यंदा,२ २ मार्च रोजी गुढीपाडवा आहे. सकाळी राज्यभरातील विविध शहरातून शोभायात्रा निघेल. तर, सायंकाळी ६ वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून ते जाहीर सभा घेणार आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, पोटनिवडणुका, आगामी निवडणुका, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय, सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील निकाल या सर्व मुद्द्यांवर राज ठाकरे काय रोखठोक भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे.

- Advertisment -