Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र भाजपकडून "सावरकर गौरव यात्रेचा" टीझर प्रदर्शित

भाजपकडून “सावरकर गौरव यात्रेचा” टीझर प्रदर्शित

Subscribe

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अपमानकारक वक्तव्य केल्यानंतर भाजपकडून त्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला. यानंतर महाराष्ट्रात राज्य सरकारकडून सावरकर गौरव यात्रेची घोषणा करण्यात आली. या यात्रेचा टीजर भाजपकडून प्रदर्शित करण्यात आला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्यानंतर भाजपकडून त्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला. यानंतर महाराष्ट्रात राज्य सरकारकडून सावरकर गौरव यात्रेची घोषणा करण्यात आली. या यात्रेचा टीझर भाजपकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या 1 ते 6 एप्रिल या काळात राज्यभरात ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.

सावरकर गौरव यात्रेचा टीझर भाजपने त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून प्रदर्शित केला आहे. हा टीझर प्रदर्शित करत त्यांनी लिहिले आहे की, “जाज्वल्य देशभक्त, ‘1857 चे स्वातंत्र्य समर’ गाथाकार, जात्युच्छेदक, प्रखर हिंदुत्ववादी या सर्व शब्दांचा अर्थ एकच… ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ …सावरकर गौरव यात्रा तुमच्या दारी! …तुम्हीही सामील व्हा! #VeerSawarkar

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी 27 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत ‘मी राहुल गांधी यांचा धिक्कार करतो. जनतेमध्ये या प्रकरणी तीव्र असंतोष आहे’ असे सांगत “शिवसेना आणि भाजपा मिळून संपूर्ण राज्यभर सावरकर गौरव यात्रा आयोजित करत आहोत”, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

- Advertisement -

“माझ्यासोबत चालत आल्यामुळे असं काही घडत असेल तर मी रोज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेच्या एकेका नेत्याला दरवाजापासून ते विधान भवनापर्यंत चालत नेईन. म्हणजे ते सगळे सावरकर की जय म्हणतील,” असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना या पत्रकार परिषदेच्यामार्फत लगावला होता.

“सावरकर यांच्या त्यागासाठी आणि देशभक्तीसाठी राज्यभरात, प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा क्षेत्रात ही यात्रा आम्ही नेणार आहोत. राहुल गांधी यांनी सावरकरांचा जो वारंवार अपमान केला आहे, त्याचा आम्ही या यात्रेतून निषेध करू”, असेही त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले होते.

दरम्यान, राहुल गांधी यांचा मात्र आम्ही तीव्र निषेध करतो. या अपमानाविरोधात राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येतील आणि ठिकठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यात येईल, अशी माहिती देखील राज्य सरकारकडून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली होती.


हेही वाचा – घासलेट चोर… माकडाची कुंडली… मिटकरींच्या टीकेवर मनसेचा जोरदार पलटवार

- Advertisment -