मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद सभेचा टीजर रिलीज

Teaser release of CM's Aurangabad meeting
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद सभेचा टीजर रिलीज

राज ठाकरेंच्या सभेनंतर मुख्यमंत्र्यांची बीकेसीत सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेचा जोरदार समाचार घेतला होती. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जूनला सभा होणार आहेत. शिवसेनेकडून औरंगाबादच्या सभेसाठी टीजर रिलीज करण्यात आला आहे.

टीझरमध्ये काय आहे? –
या टीझरच्या सुरूवातीलच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्टेजवर दिसत आहे. ते जाऊन मंचावर लोकांपुढे नतमस्तक होत आहेत. यानंतर बॅकग्राऊंडला आवाज हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे. तमाम हिंदू बांधवांनो, भगिणींनो आणि मातांनो, शिवसेना जात पात मानत नाही, शिवसेनेचा हा भगवा झेंडा डौलानं, जबरदस्त फडकत राहिलाच पाहिजे…राहिलाच पाहिजे…त्यानंतर या टीझरमध्ये कोण आला रे कोण आलाच्या घोषणांचा आवाज ऐकायला येत आहे. सत्ता असो वा नसो मला पर्वा नाही, पण आमचं हिंदू हे तकलादू नाही आमचं हिंदूत्व हे स्वच्छ आहे. असे उद्धव ठाकरे म्हणताना दिसतात. तर शेवटी या ट्रेलरच्या वाघाची डरकाळीही ऐकायला येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे लक्ष –
देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन मुख्यमंत्र्याच्या सभेवर टीका केली होती. औरंगाबादच्या नामांतरावरूनही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली होती. मुख्यमंत्री म्हणतात मी बोलता संभाजीनगर म्हणजे झालं ना…तर ओ खैरे व्हा आता बहिरे असे म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल चढवला होता. त्यामुळे आता या मुख्यमंत्री काय उत्तर देणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.कालच खैरे म्हणाले आहेत नामांतराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या सभेत नामांतराची घोषणा होणार का?, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.