ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत; ठाणे ते वाशी आणि नेरुळदरम्यान वाहतूक ठप्प

कोपरखैरणे येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे ते नेरूळ दरम्यान रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

कोपरखैरणे येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे ते नेरूळ आणि ठाणे ते वाशी दरम्यान रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. तेव्हापासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, या मार्गवारील सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, घनसोलीत वीजपुरवठा खंडीत झाल्याने लोकलसेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, ठाणे-वाशी आणि वाशी-ठाणे मार्गाने ये-जा करणाऱ्या लोकल वाहतूक सेवासुद्धा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक प्रवासी स्थानकावर खोळंबले असून काही प्रवासी निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ते मार्गाचा अवलंब करत आहेत.