घरताज्या घडामोडीठाकरेंच्या तेजसचा नवा शोध; सह्याद्रीच्या पर्वतरांगात शोधला सोनेरी केस असलेला 'हिरण्यकेशी' मासा

ठाकरेंच्या तेजसचा नवा शोध; सह्याद्रीच्या पर्वतरांगात शोधला सोनेरी केस असलेला ‘हिरण्यकेशी’ मासा

Subscribe

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे. अंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणारा माश्याची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधलीय. या माश्याची ही २० वी प्रजाती आहे. तर तेजस ठाकरे यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे. या आधी त्यांनी सह्याद्रीच्याच पर्वत रांगात पालींच्या दूर्मीळ प्रजाती शोधुन काढल्या होत्या, त्यांना आंतरारष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्र मासिकांनीही प्रसिद्धी देऊन मान्यता दिली होती.

आता हिरण्यकश नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचं नाव ‘हिरण्यकेशी’ असं ठेवण्यात आलंय. याचा संस्कृत अर्थ सोनेरे रंगाचे केस असणारा असा आहे. माश्याच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी तेजस ठाकरे यांना अंडर वाँटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डाँक्टर प्रविणराज जयसिन्हा जे रिसर्च पेपरचे प्रमुख आहेत यांचे सहकार्य मिळालं.’

- Advertisement -

तेजस ठाकरे हे ठाकरे परिवारातील इतर सदस्यांप्रमाणेच आपल्या स्वतःच्या आवडी-निवडी जपतात. वडील उद्धव ठाकरे हे फोटोग्राफीसाठी विविध ठिकाणांना भेट देतात. त्याप्रमाणेच तेजस यांना डोंगरदऱ्यात फिरून नवीन प्रजाती शोधण्याचा हव्यास असतो. याआधी त्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये ११ दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. त्यापैकी खेकड्याच्या पाच प्रजाती आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -