घरमहाराष्ट्रआजची शांतता, उद्याचं वादळ! तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? मुंबईत झळकतायत बॅनर्स

आजची शांतता, उद्याचं वादळ! तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? मुंबईत झळकतायत बॅनर्स

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूड पडली. या फुटीमुळे शिवसेना आता शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन गटात विभागली गेली. हे दोन्ही गटाकडून आता शिवसेना पक्षावर दावा सांगितला जातोय. त्यामुळे शिवसेनेतील हा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. अशात ठाकरे गटाला राजकारण नवी उभारी देण्यासाठी त्यांच्या घरातील एक नवा चेहरा राजकारणात सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गिरगावात शिवसैनिकांनी झळकवलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात ठाकरे घराण्यातील या नव्या चेहऱ्याची चर्चा सुरु झाली आहे. हे बॅनर्स दुसरे तिसरे कोणाचे नसून तेजस उद्धव ठाकरे यांचे आहेत. गिरगावातील नाक्यांवर तेजस ठाकरेंच्या नावाचे मोठे बॅनर्स झळत आहेत. शिवसैनिकांची तेजस ठाकरेंची राजकारणातील एन्ट्रीची प्रतिक्षा या बॅनर्समधून दिसून येतेय.

आजची शांतता…. उद्याचे वादळ…नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव साहेब ठाकरे अशा आशयाचे हे बॅनर्स नाक्या- नाक्यावर दिसतायत. त्यामुळे तेजस ठाकरे मुंबई महापालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की काय अशा चर्चा रंगतायत. गिरगावातील शाखाप्रमुख बाळा अहिरेकर आणि उपविभाग संघटक विशाल सागवेकर यांनी यांच्या नावाने हे बॅनर्स दिसत आहेत.

- Advertisement -

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलेय. या विरोधात महाविकास आघाडी आणि सर्व मित्र पक्षांनी हल्लाबोल मोर्चा काढला होता. या महामोर्च्यात मविआतील अनेक दिग्गज नेते झाले होते, या मोर्चात सर्वाधिक लक्ष वेधून घेण्यात उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे आघाडीवर होते, तेजस ठाकरे पहिल्यांदाच एका जाहीर राजकीय मोर्चात सहभागी झाल्याने ते चर्चेचा विषय ठरले. तेव्हापासून तेजस ठाकरेंच्या राजकारणातील एन्ट्रीबाबत चर्चा सुरु झाल्या. आता गिरगावातील बॅनर्समुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

दरम्यान मविआच्या महामोर्चात केवळ तेजस ठाकरेचं नाहीत उद्धव ठाकरे सहकुटुंब सहभागी झाले होते. यात पत्नी रश्मी ठाकरे या सुद्धा कार्यकर्त्यांसोबत घोषणाबाजी देताना दिसल्या. यापूर्वी अनेकदा तेजस ठाकरेंच्या राजकीय लाँचिंगबाबत चर्चा रंगल्या. यात आदित्य ठाके आमदार झाल्यानंतर तेजस ठाकरे यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी देण्यात येणार असं म्हटलं जात होतं. मात्र त्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.


सदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच झाला ‘तो’ गोळीबार; बॅलेस्टिक अहवालातून मोठा खुलासा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -