घरताज्या घडामोडीतेजस ठाकरे हा माझ्या डोक्याबाहेरचा विषय :भुजबळ

तेजस ठाकरे हा माझ्या डोक्याबाहेरचा विषय :भुजबळ

Subscribe

वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस असून ते राजकारणात येणार असल्याचे सुतोवाच केले जात आहे. भुजबळ आणि शिवसेना हा जवळचा संबध असल्याने याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, तेजस ठाकरे माझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे. जीवसृष्टी सोडून तो राजकारणात येईल, असे वाटत नाही, पण तरी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त राजकारणात लाँचिंग होत आहे की काय याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर विविध पोस्ट टाकण्यात येत आहे. ठाकरे कुटुंब, शिवसेना आणि भुजबळ यांचा अगदी जवळचा संबंध राहीला आहे. याबाबत आज नाशिकमध्ये एका पत्रकार परिषदेत भुजबळ यांना तेजस ठाकरेंच्या राजकारणाच्या एन्ट्रीच्या चर्चेबाबत विचारले असता ते म्हणाले, तेजस अतिशय अवघड आहे. तो माझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे. जीवसृष्टी या विषयात त्याचा गाढा अभ्यास आहे. विज्ञानाची कास सोडून तो राजकारणात येईल असे मला वाटतं नाही. अर्थात त्याबाबतचा निर्णय ठाकरे कुटुंबीयच घेतील, असे ते म्हणाले. तसेच युवकांनी राजकारणात आले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

ऑपरेश कमळ होणार नाही
दिल्लीत भाजपची बैठक होत आहे. राज्यातील नेते दिल्लीत गेले आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केले. दिल्लीत काहीही होऊ द्या. कितीही बैठका होऊ द्या. पण राज्यात ऑपरेशन कमळ होणार नाही, असे ते म्हणाले.भाजप मनसे युतीबाबत बोलतांना ते म्हणाले, भाजप-मनसे एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकशाहीत सर्वांना एकत्र येण्याचे अधिकार आहेत. शेवटी कुणाच्या बाजून कौल द्यायचा हे लोकं ठरवत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -