घरताज्या घडामोडीकोल्हापुरात शिवसेनेच्या बॅनरवर झळकला तेजस ठाकरेंचा फोटो, राजकारणात प्रवेश झाल्याची चर्चा

कोल्हापुरात शिवसेनेच्या बॅनरवर झळकला तेजस ठाकरेंचा फोटो, राजकारणात प्रवेश झाल्याची चर्चा

Subscribe

राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असा वाद सुरू आहे. परंतु कोल्हापुरात शिवसेनेकडून झळकावण्यात आलेल्या एका बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे. कोल्हापुरातील शिवसेनेच्या मेळाव्यात बॅनरवर नेत्यांसोबत तेजस ठाकरे यांचाही फोटो झळकल्याने राजकारणात प्रवेश झाल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा मोठा फोटो आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या फोटोनंतर तेजस ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांमुळे या चर्चेला अधिकच बळ मिळाले होते. मुंबईत ठिकठिकाणी दहिहंडीनिमित्त लावलेल्या बॅनर्सवर देखील तेजस ठाकरे यांचे फोटो झळकले होते. त्यावेळी त्यांचे वर्णन युवाशक्ती असे करण्यात आले होते.

- Advertisement -

शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर तेजस ठाकरे यांचा फोटो झळकला होता. मात्र, तेजस ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश झाला का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिवसेनेचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नकारात्मक उत्तर दिले होते.


हेही वाचा : दाऊदचा हस्तक रियाझ भाटीला अटक, मुंबई पोलीस मागणार 14 दिवसांची कोठडी

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -