घरमहाराष्ट्रतेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होणार? सेनेच्या नेत्यांची वक्तव्ये अन् चर्चांना उधाण

तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होणार? सेनेच्या नेत्यांची वक्तव्ये अन् चर्चांना उधाण

Subscribe

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याला कारण देखील तसंच आहे. तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटर आणि दैनिक ‘सामना’तून दिलेल्या शुभेच्छा. यानंतर शिवसेना नेत्यांनी देखील तेजस ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. त्यात त्यांनी तेजस ठाकरे यांची तुलना महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यानंतर त्यांच्या राजकीय एन्ट्रीवर चर्चा सुरु झाली.

- Advertisement -

मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावर प्रतिक्रिया देताना सूचक विधान केलं. आम्हालाही निवडणुकीची तयारी करावीच लागते. निवडणूक आम्ही कधीही सहजरित्या घेत नाही. निवडणूक हे एक युद्ध आहे. त्यामुळे आमची तयारी असणारच. त्याबाबत कुणाला अस्वस्थ होण्याची गरज नाही. कोणतीही निवडणूक आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढत असतो. आदित्य ठाकरेही सोबत आहेतच. डबल हॉर्स पॉवर आहे, असं पेडणेकर म्हणाले.

- Advertisement -

पुढे त्यांनी तेजस ठाकरेंबद्दल बोलताना तेजस ठाकरे हे नावाप्रमाणे तेजस आहेत. ते जे काही संशोधन करतात त्याला हॅट्स ऑफ आहे. ते राजकारणात येणार का? ते जर राजकारणात येत असतील तर त्यांना काय पद द्यायचं वगैरे ते उद्धव ठाकरेच ठरवतील. उद्धव ठाकरे जे काही निर्णय घेतात तो नागरिकांच्या हिताचाच असतो. आदित्य ठाकरे हे वयाच्या सोळाव्या वर्षी राजकारणात आले. त्यांनीही स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे घराण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्वही दिसून येत आहे. तेजस ठाकरे हे आक्रमक फलंदाज आहेत. ते करत असलेल्या कामामध्ये त्यांची आक्रमकता दिसते, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -