Tek Fog : टेक फॉग भाजपसाठी हत्यार मात्र देशासाठी घातक, काँग्रेसचा भाजपच्या कारनाम्यांवर हल्लाबोल

या अॅपच्या माध्यमातून देण्यात येत होते. सरकारविरोधा नागरिकांच्या प्रश्नांना अपमानास्पद उत्तर देण्यात येत होते. अशा प्रकारच्या कामांसाठी या टेक फॉगचा वापर करण्यात येत होता.

Tek Fog congress allegation bjp use tek fog applicartion for fake accounts generated threatening to destroy life
Tek Fog : टेक फॉग भाजपसाठी हत्यार मात्र देशासाठी घातक, काँग्रेसचा भाजपच्या कारनाम्यांवर हल्लाबोल

केंद्रातील भाजप सरकार सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करते. आगामाी निवडणुका आणि यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्येही भाजपकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला आहे. भाजप सोशल मीडियावर टेक फॉग नावाच्या अॅपचा वापर करत आहे. या अॅपच्या माध्यमातून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे. तसेच घाणेरड्या टिकाटिप्पणी देखील करण्यात येत आहेत. यावरुन काँग्रेसनं भाजपवर घणाघात केला आहे. हे भाजपसाठी हत्यार असलं तरी देशासाठी घातक असल्याचे काँग्रेसनं म्हटलं आहे. पेगॅसस सॉप्टवेअरचे प्रकरण शांत होत असताना आता टेक फॉगमुळे भाजपवर टीका करण्यात येत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसनं ट्विटरवरुन एक फोटो शेअर करत टेक फॉगबाबत माहिती दिली आहे. टेक फॉगच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि भाजप खोट्या बातम्या, द्वेष पसरवतो आहे. महिला व पत्रकारांवर घाणेरड्या टिकाटिप्पणी करतो आहे. भाजपसाठी टेक फॉग एक हत्यार असेल मात्र देशासाठी ते घातक असल्याचे काँग्रेनं म्हटलं आहे. भाजपने आपल्या लोकशाहीवर नष्ट करण्यात अधिकारांवर आणि स्वातंत्र्यावर गदा आणण्यात कसलीच कसर सोडत नाही असा आरोप काँग्रेसनं केलं आहे.

टेक फॉग काय आहे?

भाजपकडून वापरण्यात येणाऱ्या टेक फॉगवर काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे. भाजप सोशल मीडियावर फेक अकाऊंट आणि माहिती शेअर कऱण्यासाठी टेक फॉगचा वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. टेक फॉगमध्ये ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सिस्टम जेनरेटेड अकाउंट तयार करण्यात येतात. याच अकाउंटचा वापर करुन पत्रकारांच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. महिलांवर अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात येत होती. तसेच व्यक्ती आणि परिवारांना निसाणा करण्यात येत होते. एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकीसुद्धा या अॅपच्या माध्यमातून देण्यात येत होते. सरकारविरोधा नागरिकांच्या प्रश्नांना अपमानास्पद उत्तर देण्यात येत होते. अशा प्रकारच्या कामांसाठी या टेक फॉगचा वापर करण्यात येत होता.


हेही वाचा : PM मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीची चौकशी SCचे निवृत्त न्यायमूर्ती करणार; समितीत NIAच्या DGचाही समावेश