घर महाराष्ट्र नाशिककरांवर थंडीची जास्तच कृपा; थंडीचा पारा १.८ अंशावर

नाशिककरांवर थंडीची जास्तच कृपा; थंडीचा पारा १.८ अंशावर

Subscribe

नाशिककरांवर थंडीची जरा जास्तच कृपा असल्याचं दिसतंय आहे. आज निफाड तालुक्यात थंडीचा पारा १.८ अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक शेकोट्या करून ऊब घेत आहेत.

गेल्या ८ ते १० दिवसांपासून मुंबईसह राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नगर या प्रमुख शहरांसह संपूर्ण राज्यात कमी-जास्त प्रमाणात थंडीचा तडाखा जाणवतो आहे. गेल्या २-३ महिन्यांपासून उन्हामुळे त्रस्त असलेले नागरिक या थंडीमुळे सुखावले असल्याचं चित्र आहे. मात्र, नाशिककरांवर थंडीची जरा जास्तच कृपा असल्याचं दिसतंय. जिल्ह्यातील निफाडमध्ये आज १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

बर्फाची झालरं

लासलगांव येथील निफाड तालुक्यात थंडीने या हंगामातील निचांक गाठला आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील क्रुषी संशोधन केंद्रावर १.८ अंश इतकी तापमानाची नोंद झाली आहे. तर तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या उगांव शिवडी सोनेवाडी भागात द्राक्षबागांत दवबिंदुंची बारीक बर्फाची झालरं तयार झाली आहे. या कडाक्याच्या थंडीने द्राक्षमालाची फुगवण थांबली आहे. तर थंडीचा पारा घसरल्याने परिपक्व द्राक्षमणी तडकुन नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान सदरचे तापमान हे कोणत्याच पिकाला चांगले नाही. या तापमानामुळे द्राक्षबागेत केवळ‌ द्राक्षांनाच नव्हे तर द्राक्षवेलीतील पेशींनाही जखमा होण्याचा धोका आहे. द्राक्षबागांना ठिबकद्वारे पाणी देणे गरजेचे असते. मात्र भारनियमनाच्या त्रासाने तेही शक्य होत नसल्याचे सोनेवाडी येथील प्रगतिशील द्राक्ष निर्यातदार संजय गवळी यांनी सांगितले आहे.


- Advertisement -

वाचा – थंडीचा तडाखा; नागरिक खुश तर शेतकरी त्रस्त


 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -