बार उघडले तेव्हा मंदिर का नाही उघडली? मुंबादेवीनं विचारल्यावर काय उत्तर देणार – राम कदम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनाला

Temple Reopen ram kadam slams thackeray sarkar on late reopen mandir mumbadevi
बार उघडले तेव्हा मंदिर का नाही उघडली? मुंबादेवीनं विचारल्यावर काय उत्तर देणार - राम कदम

कोरोना काळात बंद कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थनालये बंद करण्यात आली होती. अखेर कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. परंतु आज खुद्द आई भवानी आणि मुंबादेवी ठाकरे सरकारला विचारेल राज्यातील बार उघडले तेव्हा मंदिरं का नाही उघडली? याचे उत्तर काय देणार? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी पहाटेच मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिर सुरु करण्यात आली आहेत. ठाकरे सरकारने ज्यावेळी बार सुरु केले तसेच नियम करुन मंदिरं का नाही सुरु केली असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे.

भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी ठाकरे सरकारवर ट्वविट करत हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या अन्यायकारक वसूली प्राधान्य धोरणामुळे आज महाराष्ट्रातील सर्व मंदिरे १०५ दिवस बंद होती. सर्व गणेश, देवो, स्वामी, भक्तांना त्यांनी त्यांच्या खोट्या इगो पोटी दर्शना पासून वंचित ठेवले. जेव्हा बार उघडले तेव्हा तेच नियम लावून ठाकरे सरकारने मंदिरे का उघडली नाहीत? ह्याचे उत्तर आज खुद भवानी अन मुंबादेवी सुद्धा महाराष्ट्र सरकारला विचारेल काय उत्तर देणार? असो आम्ही ११ वाजता मुंम्बादेवी दर्शनासाठी वाजता गाजत जाणार असल्याचे राम कदम यांनी म्हटलं आहे.

राज्यत कोरोनाचा प्रादुर्भाव पहिल्या लाटेनंतर अधिक फोफावला होता यामुळे राज्य सरकारने मंदिरं सुरु न करण्याया निर्णय घेतला होता. दुसऱ्या लाटेत कोरोना प्रादुर्भावाचे तीव्र पडसाद उमटले होते यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी बाळगली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यामुळे राज्य सरकारने टास्क फोर्ससोबत चर्चा करुन अखेर मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शाळाही सुरु करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनाला

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिवारासह मुंबादेवीच्या दर्शनाला गेले होते. कोरोनाचे सावट कायमचे जाऊ दे अशी प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले होते. राजकीय नेते पहाटेच दर्शन घेण्यासाठी गेले होते.

नियमांचे पालन करुन भाविकांना दर्शन

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फोफावू नये यासाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. कोरोना नियमांचे पालन करुनच भविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. मंदिरात गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे. तसेच भविकांना मंदिरात सॅनिटायझर देण्यात यावे तसेच मास्कचा वापर बंधनकारक असल्याचे नियमावलीमध्ये म्हटलं आहे.


हेही वाचा : राज्यात १०५ दिवसांनी मंदिरे खुली, नवरात्रौत्सवासाठी मंदिरांमध्ये जय्यत तयारी