घरमहाराष्ट्रमुंबई ईस्टर्न एक्सप्रेसवर टेम्पो उलटून अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

मुंबई ईस्टर्न एक्सप्रेसवर टेम्पो उलटून अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

Subscribe

या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत तुफान पाऊस (Heavy rain in mumbai) कोसळत आहे. दरम्यान, मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी टेम्पो डिव्हायडरला धडक मारून उलटला. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. (Tempo accident on mumbai express highway will be major traffic jam)

हेही वाचा – मुसळधार पावसात दरड कोसळणे, घरे व झाडांची पडझड सुरूच

- Advertisement -

पोलिसांनी टेम्पो चालकाला बाहेर काढले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पाऊस असल्याने आधीच वाहतूक कोंडी होत असते, त्यात या अपघातामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन कारावा लागू नये म्हणून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली आहे.

संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून पावसाने मुंबईसह अनेक भागात दमदार एन्ट्री घेतली. सोमवारपासून तुफान पावसाला सुरुवात झाली असून पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

- Advertisement -

हेही वाचा – अखेर त्या चार इमारतींच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला

मुंबई कुलाबा येथे ८४ मिमी तर सांताक्रूझ येथे १९३.६ मिमी पावसाची बुधवारी नोंद झाली. मुंबईतील जवळपास २५ ठिकाणं पाण्याखाली गेले होते. त्यामध्ये अंधेरी सबवे  टिळक नगर टर्मिनस, टेम्बी ब्रिज परिसर, शेख मेस्त्री दर्गा कुर्ला, दादर टीटी याठिकाणी पाणी साचलं होतं. त्यामुळे बेस्टचे बसचेही मार्गही वळवण्यात आले होते. रेल्वेच्या तिन्ही मार्गांना फटका बसला होता, सर्व लोकल धीम्या गतीने चालत असल्याने मुंबईकरांची चांगलीच कोंडी झाली होती. दरम्यान, मुंबईत एनडीआरएफचे तीन पथक तैनात करण्यात आले आहेत.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -