घरमहाराष्ट्रनाशिकगोमांस नेणारा टेम्पो पकडला, नाशिकमधील घटनेत चालक ताब्यात

गोमांस नेणारा टेम्पो पकडला, नाशिकमधील घटनेत चालक ताब्यात

Subscribe

वेगवेगळ्या नंबर प्लेट्सच्या वापरामुळे पोलिसांसह आरटीओ विभागापुढे आव्हान

मालेगावकडून मुंबईच्या दिशेने २ टन गोमांस घेऊन जात असलेला टेम्पो (MH-41, AU-4131) नाशिकमधील काही जागरुक युवकांनी पकडला. या वाहनासह त्याच्या चालकाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या गाडीमध्ये तीन वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबरप्लेट आढळून आल्याने, यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे.

अमिरखान अन्वरखान (रा. मालेगाव) असे पकडण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. गोमांस कुठून आणले आणि कुणाला दिले जाणार होते, याचा पोलीस तपास करत आहेत. आजवर वारंवार अशा गोमांस घेऊन जाणाऱ्या वाहनांसह आरोपींवर पोलिसांकडून कारवाई झालेली आहे. मात्र, तरीही चोरीछुप्या पद्धतीने दररोज मोठ्या प्रमाणावर गोमांस वाहतूक सुरू असल्याचं यानिमित्ताने पुढे आलं आहे. बनावट नंबरप्लेट बनवण्यामागे पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागाची दिशाभूल करण्याचा हेतू असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी यामागील रॅकेटच्या मुळाशी जावं, अशी मागणी केली जाते आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -