घरताज्या घडामोडीराज्यात करोना व्हायरसचे १० रुग्ण - उद्धव ठाकरे

राज्यात करोना व्हायरसचे १० रुग्ण – उद्धव ठाकरे

Subscribe

राज्यात करोनाचे १० पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. संपूर्ण जगभरात करोना व्हायरस झपाट्याने पसरू लागला आहे. आता त्याचे लक्षणे महाराष्ट्रातही दिसून येत आहेत. प्रत्येक वेळेला कुठेना कुठे करोनाचा रूग्ण आढळून आल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे अधिकृत माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचेही मुख्यंमत्र्यांनी सांगितले. आजपर्यंत महाराष्ट्रात एकूण १० पॉझिटिव्ह करोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यांना पॉझिटिव्ह म्हटले तरी तशी लक्षणे दिसून येत नाही. एखादा व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आला तर घाबरून जाण्यासारखे काही कारण नाही. सुदैवाने राज्यात आढळलेले करोनाच्या रूग्णांमध्ये गंभीर असे लक्षणे आढळून आलेले नाही. १ मार्च रोजी एक ग्रुप परदेशातून आला त्यांच्या संपर्कातून करोना व्हायरस पसरला आहे. यासर्व व्यक्तींशी संपर्क साधला आहे. पुण्यामध्ये आतापर्यंत आठ व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. आठही जण रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आपले सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून जाण्यासारखे कारण नाही, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update – करोनाग्रस्तांना मिळणार आता विम्याचे कवच!


मुंबईमध्ये सुद्धा या ग्रुपच्या संपर्कात असलेल्या दोघांना करोनाची बाधा झाली आहे. कारण नसताना कुठेही गर्दी करू नका. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच ज्या नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे, त्यांनी शक्यतो १४ दिवस घरामध्ये वेगळे राहावे. करोनाची लक्षणे १४ दिवसांच्या कालावधीत दिसून येतात. दुपारी तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेतली, तेव्हा पुण्यातील संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर एक मागणी अशी केली जातेय की, तिथल्या शाळा, महाविद्यालयाना सुट्टी द्यावी. परंतु आज तरी तसा निर्णय आपण घेत नाही आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागात जावून जनजागृती करतील. आणि लवकरच अधिवेशनाचे कामकाज संपवून लोकप्रतिनिधीनी आपल्या परिसरात लक्ष द्यावे. हॅण्ड वाॅशने हात स्वच्छ धुवावे, बाहेरून आल्यावर चेहरा आणि डोळ्यांना हात लावू नये, तसेच हात मिळवणी करून नये, या गोष्टींची खबरदारी नागरिकांनी घ्यावी. आयपीएल प्रेक्षकांविना घेण्याची अधिकृत सुचना आलेली नाही. मुंबई, पुणे व नागपूर  येथे करोना तपासणी केंद्र आहे. आणखी तपासणी केंद्र वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. गरज पडल्यास करोना तपासणी केंद्र वाढविले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी परिषदेत सांगितले.
अधिवेशन शनिवारी संपवण्याची दाट शक्यता आहे. आजच्या घडीला करोनाचे संकट येऊ घातले असून प्रत्येक ठिकाणच्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात लक्ष दिले पाहिजे. उद्यापासून विधीमंडळात आमदार आणि अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त गर्दी टाळावी. तसेच बाहेरच्या ठिकाणाचे कार्यक्रम टाळावेत.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -