घरताज्या घडामोडीसांगलीत मगरींची दहशत, कृष्णा नदीच्या पात्रात आढळल्या दहा मगरी

सांगलीत मगरींची दहशत, कृष्णा नदीच्या पात्रात आढळल्या दहा मगरी

Subscribe

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पात्रात दहा मगरी आढळून आल्या आहेत. पलूस तालुक्यातील औदुंबर-भिलवडी-चोपडेवाडी नदीकाठी निसर्गप्रेमींना जवळपास दहा लहान-मोठ्या मगरींचा अधिवास पाहायला मिळाला आहे. तसेच या मगरींचा आकार सहा ते चौदा फुटांपर्यंत आहे. परंतु यंदा कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला ब्रेक मिळाला आहे.

कृष्णा नदीत कारखान्याच्या प्रदूषित पाण्याचं प्रमाण वाढलं असून नदीतले मासे मृत्युमुखी पडले आहेत. खिलापिया मासे मगरीच्या खाद्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मुबलक खाद्य असल्याने मगरींचा वावर वाढला असल्याचं निसर्गप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

कृष्णाकाठी ज्या ज्या ठिकाणी गावागावातील गटारगंगा नदीच्या पाण्यात मिसळते. त्या त्या ठिकाणी खिलापीया मासे प्रचंड वाढले आहेत. ते खाण्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षात मगरींचा पाणवठ्यावर वावर वाढला असल्याचे निसर्गप्रेमी आणि प्राणीमित्र संदीप नाझरे यांनी सांगितले आहे.

कृष्णा नदी मगरींची नदी म्हणूनच ओळखली जाते. त्यामुळे सांगली जिल्ह्यात मगरींची दहशत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच परिसरात अनेक वेळा मगरींकडून हल्ले झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. ज्यामध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. नदीकाठी असलेल्या गावकऱ्यांना तसेच किनाऱ्याला लागून असलेल्या शेतात शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.

- Advertisement -

दरम्यान, वनखात्याने मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे. तसेच नदीकाठी संरक्षक जाळी, वीज व्यवस्था करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वन विभागाकडून करण्यात येत आहे.


हेही वाचा : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला; पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचे, हवामान खात्याकडून


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -