घरमहाराष्ट्रभय्यूजी महाराजांबद्दल '१०' ठळक गोष्टी

भय्यूजी महाराजांबद्दल ‘१०’ ठळक गोष्टी

Subscribe

अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराजांनी नैराश्याला कंटाळून त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. एकेकाळी शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, यासाठी भय्यूजी महाराज प्रयत्नशील होते. कोपर्डीची दुर्दैवी घटना घडल्यानंतरही भय्यूजी महाराजच तिथे आधी पोहोचले होते. काही महिन्यांपूर्वीच मध्य प्रदेश सरकारने त्यांच्यासहित पाच अध्यात्मिक बाबा व गुरुंना मंत्रीपदाचा दर्जा दिल्यामुळे भय्यूजी महाराज चर्चेत होते. राजकारण, समाजकारण, अध्यात्म अशा क्षेत्रात वावरणारे नेमके कोण होते भय्यूजी महाराज? काय होती त्यांची पार्श्वभूमी?

भय्यूजी महाराज यांच्याविषयीच्या १० ठळक गोष्टी

१. भय्यू महाराज यांना मॉडर्न आणि राष्ट्रीय संत म्हणून ओळखलं जायचं. शुजालपूरच्या जमीनदार कुटुंबात १९६८ साली जन्मलेल्या भय्यू महाराजांचे खरं नाव उदयसिंह देखमुख असं होते.
२. वयाच्या २० व्या वर्षी भय्यूजी महाराज मॉडेलिंग क्षेत्रात उतरले. कपड्यांच्या एका ब्रॅंडसाठी त्यांनी मॉडेलिंग केले होते. मात्र दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अध्यात्माकडे वळवला. 
३. भय्यू महाराज यांच्यावर याआधी २ वेळा प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र दोन्ही हल्ल्यांमधून ते सुखरुप बचावले होते. त्यांच्या ड्रायव्हरने याविषयी तक्रार नोंदवली होती.
४. अण्णा हजारे यांच्या उपोषणावेळी ते सर्वाधिक चर्चेत आले होते. कारण हजारे यांचे उपोषण सोडवण्यासाठी केंद्र सरकारने भय्यू महाराजांना आपला दूत बनवून पाठवले होते. त्यांच्याच हातून ज्युस पित अण्णांनी उपोषण सोडले होते.
५. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींनी सद्भवना उपोषण केले होते. त्यावेळी त्यांचा उपवास सोडवण्यासाठी भय्यू महाराजांना आमंत्रित केले होते.
६. १९९६ मध्ये त्यांनी सूर्योदय परिवार आणि आश्रमाची स्थापना केली. त्यांचा वेगवेगळ्या संस्थांच्या स्थापनेत वाटा होता.
७. कोल्हापूरच्या डी.वाय.पाटील विद्यापिठाद्वारे त्यांना डी.लिट. या पदवीने गौरवण्यात आलं होत.
८. त्यांनी आजवर अनेक रुग्णांसाठी विशेष काम केलं होतं. तर देशभरात ११ लाख ११ हजार १११ झाडं लावण्याचा संकल्पही केला होता.
९. कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर भय्यूजी महाराजांनी परिसरातील मुलींच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली होती. त्यांच्या संस्थेकडून परिसरातील मुलींना शाळेत नेण्याआणण्यासाठी खासगी वाहनांची सोय करण्यात आली होती.
१०. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या राजकारणांमध्ये भय्यूजी महाराजांचं महत्वाचं योगदान होतं.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -