घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या संगमनेरात दहावा बळी

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या संगमनेरात दहावा बळी

Subscribe

नव्याने आढळले चार पॉझिटिव्ह रुग्ण

संगमनेरात दोन दिवसांपासून खंडीत झालेली करोना बाधितांची मालिकेने बुधवारी पुन्हा एकदा डोके वर काढले. शहरातील राजवाडा भागात रविवारी आढळलेल्या ३८ वर्षीय बाधित महिलेचा आज मृत्यू झाला आहे. संगमनेरमधील हा कोरोनाचा दहावा बळी आहे. तर नव्याने चार पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. करोनाने बुधवारी शहरातील उच्चभ्रू वसाहतीत आता शिरकाव केला आहे.

यामुळे संगमनेर अद्यापही कोरोनाच्या धोक्यातून बाहेर आलेले नाही. बुधवारी सकाळी जिल्हा व तालुका प्रशासनाला मिळालेल्या अहवालामध्ये चार रुग्ण बाधित आढळून आले. यात एक ४८ वर्षीय व्यक्ती ठाण्यावरुन संगमनेरमध्ये आलेला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरातील ऑरेंज कॉर्नर परिसरातील उच्चभ्र्ु वसाहतीत असलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला बाधा झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तर यापुर्वी बाधित रुग्ण आढळलेल्या आणि कन्टेन्टमेंट झोनमध्ये असलेल्या कोल्हेवाडी रोडवरील चाळीस वर्षीय व्यक्तीला बाधा झाली असून यापुर्वी बाधित आढळलेल्या नवघरगल्ली परिसरातदेखील पुन्हा नव्याने २६ वर्षीय तरुण बाधित आढळला आहे.

- Advertisement -

बुधवारी झालेला एका महिलेचा मृत्यू आणि नव्याने आढळलेल्या चार बाधितांमुळे संगमनेरातील करोना आलेख वाढला असून बाधितांची संख्या ९७ वर गेली आहे. तर मृत झालेल्यांनी दोन अंकी संख्येत प्रवेश केला. आत्तापर्यत मृत झालेल्या दहा जणांपैकी पाच व्यक्ती शहरातील तर पाच व्यक्ती निमोण, धांदरफळ, डिग्रस, शेडगाव येथील आहेत. एकट्या संगमनेर शहरातच करोनाचे ६० रुग्ण आढळून आले आहेत.

चौदा जणांवर उपचार सुरु

बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या तीन जणांना घरी सोडण्यात आल्यानंतर त्यात नव्याने आणखी तीन रुग्णांची भर पडल्याने सध्या रुग्णालयात चौदा जणांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यत ७३ व्यक्ती करोनामुक्त झाल्या आहेत. संगमनेरात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी असली तरी बाधितांचा व मृतांचा आकडा जिल्ह्यातील सर्वाधीक आहे. यामुळे प्रशासनासमोरिल चिंता वाढल्या आहेत. कोरोनाचा वाढता आलेख थांबविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. कोरोनाचा धोका वाढत असतांनादेखील संगमनेरातील नागरिकांच्या मुक्त संचार सुरुच आहे. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -