Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सांगलीत कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

सांगलीत कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

Subscribe

सांगलीतील रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सातजण हे बोलेरोमधून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. हे सर्वजण मिरज जवळ आले असता राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर आणि बोलेरो या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, बोलेरो थेट ट्रॅक्टरमध्ये घुसली.

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्गाचा मिरज पासून सुरू होणारा टप्पा काल (मंगळवार) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा मार्ग खुला झाल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी हा अपघात झाला आहे.

नेमकं अपघात होण्याचं कारण काय?

  • वाहन चालवताना चालकांचे वेगावर नियंत्रण नसणे.
  • मद्य पिऊन वाहन चालवणे.
  • धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करणे.
  • क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे.
  • इतर वाहतूक नियमांचे पालन न करणे.
  • अधिक वेळ वाहन चालवणे.
  • गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे.

- Advertisement -

हेही वाचा : शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची


 

- Advertisment -