घरताज्या घडामोडीterrorist arrest : केंद्रीय मंत्र्यांना अटक, नेत्यांविरोधात कारवाई करण्यात ठाकरे सरकार मग्न,...

terrorist arrest : केंद्रीय मंत्र्यांना अटक, नेत्यांविरोधात कारवाई करण्यात ठाकरे सरकार मग्न, शेलारांचे टीकास्त्र

Subscribe

आमदारावर लुक आऊट सर्क्युलर काढण्याचा प्रकार करणारे आमच्या राज्याचे पोलीस या दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते.

सणासुदीच्या काळात दिल्लीच्या पथकाने दहशतवाद्यांना धारावीतून अटक केली आहे. यामुळे मुंबईतील घातापात उधळून टाकण्यात दिल्लीच्या पथकाला यश आलं आहे. दिल्लीच्या पथकाने महाराष्ट्रात येऊन कारवाई केल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे. मुंबईत धारावीत आणि राज्यातसुद्धा आशा प्रकारच्या दहशतवाद्यांचा निवास आणि कटकारस्थान सुरु होते तर राज्यातले एटीएस पथक झोपले होते का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. केंद्रीय मंत्र्यांना अटक, नेत्यांविरोधात कारवाई करण्यामध्ये सरकार मग्न असलेले पोलीस या प्रकरणाबाबत भूमिका स्पष्ट करतील का? गृहमंत्र्यांनी देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

दिल्लीतील दहशतवाद्यांचं मुंबई कनेक्श समोर आल्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. दिल्लीच्या पथकाने दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं असून त्यांचे आता मुंबई कनेक्शन समोर आलं आहे. मुंबईत हे दहशतवादी घातपाताच कट करत असताना राज्याच्या एटीएस पथकाला याची माहिती नव्हती का? गृहमंत्र्यांना याबाबत काही माहिती होती का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधाता म्हटलं आहे की, नवरात्र, रामलीला आणि उत्सव काळात घातपात घडवणाऱ्या पथकाला दिल्लीच्या पथकाने अटक केली आहे. जान मोहम्मद आणि शमीद यांना महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. एकास धारावीतून अटक करण्यात आली आहे. मग आमच्या हिंदूंच्या सणांवर एका अर्थाने दहशतावीद हल्ला करण्याचा कट करणाऱ्या या दहशतवाद्यांना आर्थिक रसद दाऊदचा छोटा भाऊ हमीद शहमद पुरवत होता. यांचं प्रशिक्षण सीमेपार पाकिस्तानमध्ये झाले आहे. मुंबईत धारावीत आणि राज्यातसुद्धा आशा प्रकारच्या दहशतवाद्यांचा निवास आणि कटकारस्थान सुरु होते तर राज्यातले एटीएस पथक झोपले होते का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

सरकार मंत्र्यांविरोधात कारवाई करण्यात मग्न

नॉन कॉग्नीजेबल ऑफेन्समध्ये केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे पोलीस, पत्रकारांना हटकवताना हात नाही तर लाथ लावू असे सांगणारे पोलीस आणि राज्यातल्या एका आमदारावर लुक आऊट सर्क्युलर काढण्याचा प्रकार करणारे आमच्या राज्याचे पोलीस या दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते. याबाबतीत गृहमंत्री भूमिका स्पष्ट करतील का? या सगळ्या प्रकारची माहिती राज्यातील पोलिसांना होती का? गृहमंत्र्यांना होता का? त्यांना कल्पना होती तर त्यांनी काय भूमिका घेतली? का मग पुन्हा विशेष वर्गातील लोकं असतील तर मवाळ भूमिका असं काही राजकीय प्रकरण नाही ना? म्हणून या गंभीर विषयावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या इंटेलिजेंस फेल्युरवर भूमिका स्पष्ट करावी. अजून अशा पद्धतीच्या दहशतवादी कारवाया करण्याच्या मनस्थितीमधील लोकं आहेत का? याचा शोध घेण्याचा ससेमीरा वाढवावा असं आमचे म्हणणं आहे. या विषयावर गृहमंत्र्यांनी बोलावं असे आंमचे आवाहन असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : राजस्थान, उत्तर प्रदेशातून सहा दहशतवाद्यांना अटक


Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -