घरताज्या घडामोडीकोरोनाचा सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट ही त्रिसूत्री

कोरोनाचा सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट ही त्रिसूत्री

Subscribe

जिल्हाधिकारी सूरज मांढरे : ‘मी जबाबदार’ मोहिमेच्या भित्तीपत्रकांचे अनावरण

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हयात टेस्ट, ट्रॅक, ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येणार असून सर्व यंत्रणा मिळून यात सहभागी होऊन कोरोनावर नियंत्रण मिळवले जाईल असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. दरम्यान यावेळी ‘मी जबाबदार’ ही विशेष मोहिम सुरू करण्यात आली असून या मोहिमेच्या भित्तीपत्रकांचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्र्यांंनी नाशिक जिल्हयाच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असून या भित्तीपत्रकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होईल व जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेला नागरीक प्रतिसाद देतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी वरील त्रिसूत्री सोबतच लसीकरणाचा बाधित क्षेत्रामध्ये सुयोग्य वापर करून रुग्णवाढ थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटीलेशन बेड , रेमडिसिव्हर व अन्य औषधे यासह आवश्यक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून मागील वर्षीची लाट व यावर्षीची लाट यातील क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबी मधील फरक आणि त्यादृष्टीने प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी यांनी मांडली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपा नाशिक प्रशासनामार्फत सुरू असलेल्या विविध उपाययोजनांबाबत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

Manish Katariahttps://www.mymahanagar.com/author/kmanish/
गेल्या १७ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, प्रशासकीय मुद्यांवर वृत्तांकन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -