घरमहाराष्ट्रमातोश्रीवर ठाकरे-पवार यांची 70 मिनिट बैठक, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित

मातोश्रीवर ठाकरे-पवार यांची 70 मिनिट बैठक, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित

Subscribe

राज्याच्या राजकारणात वेगाने घडमोडी घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार महाराष्ट्रात सत्ता बदलासाठी तिकडे गुहाटीमध्ये रणनीती आखत आहेत ते विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याच्या तयारी आहे. तर महाविकास आघाडी सरकारदेखील बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी रणनीती आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील उपस्थित आहेत. गेल्या 70 मिनिटांपासून ही बैठक सुरु होती.

उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल  यांची बैठक झाली. त्यांच्यात बराचवेळ चर्चा सुरु होती. या बैठकीत आता पुढील रणनीती काय आखायची यावर चर्चा झाल्याचे समजते आहे. जवळपास तासभर ही चर्चा झाली. यानंतर संजय राऊत मातोश्रीवर आले. त्यानंतर शिवसेनेचे आणखी काही खासदार मातोश्रीत जाताना दिसले. दरम्यान, मातोश्रीबाहेर अनेक शिवसैनिक जमले होते. त्यांच्याकडून घोषणाबाजी सुरु होती.

- Advertisement -

मातोश्रीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक सुरु असताना विधान भवनात देखील हालचालींना वेग आला आहे. विधान भवनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत सलग दोन तासांपासून बैठक सुरु होती. या बैठकीला शिवसेना खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई उपस्थित होते. शिवसेनेने 16 आमदारांच्या अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधान भवनात नरहरी झिरवळ यांच्या दालनात बऱ्याच वेळेपासून खलबते सुरु आहेत. या बैठकीनंतर झिरवळ पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -