ठाकरे आणि सरवणकर समर्थक आमनेसामने; माहिम आणि धारावीत जोरदार राडा

mahim and dharavi

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सदा सरवणकर समर्थक आणि ठाकरे समर्थक आमने-सामने येत आहेत. यांच्यात शाब्दिक चकमक होत असून कालपासून दोन ठिकाणी दोन्ही गटांत राडा झाला आहे. माहिम आणि धारावी अशा दोन्ही ठिकाणी या दोन्ही गटात वाद झाला. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद मिटवण्यात आला.

हेही वाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार का? शिवसेनेच्या याचिकेवर हायकोर्टात आज सुुनावणी

गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी प्रभादेवीत ठाकरे गट आणि सदा सरवणकर यांचे समर्थक भिडले होते. यावेळी सदा सरवणकर यांच्याकडून गोळीबार करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला होता. त्यानंतर, आता पुन्हा माहिममध्ये दोन्ही गटांत राडा झाला. दसरा मेळाव्यावरून माहिमध्ये शिंदे समर्थकांची बैठक सुरू होती. ही बैठक संपल्यानंतर सदा सरवणकर बाहेर येत असताना शिवेसैनिक आणि सरवणकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, यावेळी पोलिसांचा फौजफाटा उपस्थित असल्याने वाद वाढला नाही.

हेही वाचा – पाकिस्तानी, इराणी, अफगाणी तस्करांना गुजरातची किनारपट्टी इतकी सुरक्षित का वाटते? शिवसेनेचा खोचक टोला

दुसरा वाद धारावीत झाला आहे. धारावी मिल कंपाऊंड येथे मॉर्निंग स्टार शाळेत सदा सरवणकर यांची बैठक होती. या बैठकीनंतरही दोन्ही गटात वाद झाला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शिवीगाळ केल्याचा आरोप सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय. त्यामुळे शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता दोन्ही गटाकडून रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांसाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनला आहे. सेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या गटनेते मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर बाण सोडले होते. गोरेगाव येथील नेस्को मैदानातील त्यांचा सभा प्रचंड गाजली. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष दसरा मेळाव्यातील भाषणाकडे आहे. आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे काय रणनीती आखतात हे या मेळाव्यातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.