घरमहाराष्ट्रThackeray faction : पुण्यनगरीत अजितदादांच्या कृपेने जे घडते आहे..., ठाकरे गटाचा निशाणा

Thackeray faction : पुण्यनगरीत अजितदादांच्या कृपेने जे घडते आहे…, ठाकरे गटाचा निशाणा

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य असून त्यास दिल्लीचा खुला आशीर्वाद आहे. पुण्यनगरीत तर अजितदादांच्या कृपेने जे घडते आहे ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बेशरमपणाचे लक्षण आहे. पार्थ पवार यांनी कुख्यात गजा मारणेची त्याच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आणि ‘विचारांची देवाणघेवाण’ केली, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : बाळराजांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज, राऊतांनी साधला श्रीकांत शिंदेंवर निशाणा

- Advertisement -

नगर जिल्ह्यात आमदार संग्राम जगताप यांच्या झुंडशाहीने अघोरी टोक गाठले आहे. जगताप यांच्या टोळीतले लोक खून, अपहरण, संपत्तीचा अवैध कब्जा वगैरे प्रकरणांत गुंतले आहेत. सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजकांना तेथे जगणे कठीण झाले. जगताप हे अजित पवार गँगचे सदस्य आहेत. शिंदे गँगचे प्रकाश सुर्वे हे जाहीरपणे लोकांचे हातपाय तोडण्याची भाषा करतात, त्यांचे पुत्र बिल्डरांच्या कार्यालयात घुसून धमक्या देतात. आणखी एक गँग मेंबर सदामामा सरवणकर हे जाहीरपणे पिस्तुलांचे बार उडवतात आणि सरकारचे मिंधे पोलीस त्यांना पाठीशी घालतात, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आली आहे.

गेल्या चार महिन्यांत पुण्यातील अनेक खतरनाक गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाला. कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील पाच जणांच्या बाबतीत आरोपपत्र दाखल करण्यास जाणूनबुजून विलंब केला गेला. त्यामुळे जामिनाचा मार्ग मोकळा झाला. तर, नगरमधील राहुरी येथील अॅड. राजाराम आढाव आणि अॅड. मनीषा राजाराम आढाव या वकील दांपत्याचे अपहरण करून त्यांचा अमानुष खून करण्यात आला. राज्यभरातील वकील आढाव यांच्या खुनाचा निषेध करण्यासाठी मुंबईत पोहोचले, तेव्हा त्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न केले, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ulhasnagar firing : गुन्हेगारांचे राज्य गुन्हेगारांसाठी चालवले जात आहे, ठाकरे गटाचा घणाघात

हे चित्र चांद्यापासून बांद्यापर्यंत सुरूच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुंडांचेच राज्य असून ‘सागर’ आणि ‘वर्षा’ बंगल्यावर त्यांचे ‘बॉस’ आहेत, असे सत्ताधारी पक्षाचेच आमदार जाहीरपणे सांगतात. तेव्हा कायद्याचे राज्य येणार कोठून? जे राज्य गुंड आणि झुंडशाहीतून निर्माण झाले, त्या राज्यात यापेक्षा वेगळे काय घडणार? असा उद्विग्न सवाल या अग्रलेखत करण्यात आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कोकणातील सभा उधळून लावू अशा धमक्या भाजपाचे फुसके बार देतात ते ‘सागर’ बंगल्यात गुंडांचे बॉस बसल्यामुळेच. आमचे कोण काय वाकडे करणार, अशी भाषा हे लोक करतात आणि ‘सागर’ बंगल्यावरचे ‘बॉस’ त्यावर मूग गिळून गप्प बसतात, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी करण्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले. हे ढोंग आहे. महाराष्ट्रातील गुंडांचे राज्य मोडून काढण्याची हिंमत त्यांच्यात नाही. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच गुंडांचे राज्य चालवत आहेत, असे शरसंधान ठाकरे गटाने केले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : गणपत गायकवाड प्रकरणावरून राऊतांचे भाजपावर गंभीर आरोप, सोमय्यांनाही सुनावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -