घरताज्या घडामोडीठाकरे सरकारचा मोठा निर्णय : सेवेदरम्यान अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला नोकरी

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : सेवेदरम्यान अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला नोकरी

Subscribe

राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा

राज्य सरकारने अधिकाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अधिकाऱ्यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्यात येणार असल्याचा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे शासकीय अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात अनेक अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे. यामुळे अधिकारी संघटनांनी अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी केली होती. याबाबत प्रस्ताव सादर केला असून मंत्रिमंडळाने अधिकाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला असून मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीतदेखील हे अनुकंपा धोरण लागू करावे. कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांचीदेखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला होता.

- Advertisement -

या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून “महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१ तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे, यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -