ठाकरे सरकारमध्ये भूकंप; ठाणे, कोकण, मराठवाड्यातील 25 आमदारांसह एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

एकनाथ शिंदे यांनी याबाबत वारंवार त्यांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती मात्र तरीदेखील एकनाथ शिंदे यांच्या नाराज चित्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना शिंदे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या काही दिवसांमध्ये बळावली होती

Eknath Shinde's new tweet after his name for the post of Chief Minister was announced

मराठवाडा, कोकण, ठाण्यातील किमान वीस आमदारांसह शिवसेनेचे नगर विकास मंत्री तसेच ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे हे थेट काल रात्री सायंकाळपासून नॉट रिचेबल असून ते थेट गुजरातच्या सुरतमधील हॉटेल मेरिडिअनमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कारभारावर गेले वर्षभर प्रचंड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होतीच. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आले आहे.

काल दिवसभर विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू होती विधानपरिषदेच्या कालच्या निवडणुकीतही काँग्रेसबरोबरच शिवसेनेचीही मते कुठली आहेत ही तुटलेली सर्व मते एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची असण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळेच काल संध्याकाळी एकनाथ शिंदे विधानभवनातून मतमोजणीचा निकाल लागण्याआधीच बाहेर पडले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील किमान 20 आमदार एकनाथ शिंदेयांच्या बरोबर असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचा शिक्का आहे अशा शिवसेना आमदारांचे मोबाईल फोन हे नॉटरिचेबल झाले आहेत त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरतमधील हॉटेलमध्ये असावेत असा सेना नेत्यांचा कयास आहे. (Earthquake in Thackeray government Eknath Shinde in Gujarat with 25 MLAs from Thane Konkan Marathwada)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जरी राज्याचे क्रमांक दोनचे नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांना दिले असले तरीदेखील नगरविकास खात्याच्या कारभारावर युवासेना प्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल चालत होता. महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये देखील एकनाथ शिंदे यांना डावलत परस्पर नियुक्त्या केल्या जात होत्या. एकनाथ शिंदे यांनी याबाबत वारंवार त्यांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती मात्र तरीदेखील एकनाथ शिंदे यांच्या नाराज चित्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना शिंदे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या काही दिवसांमध्ये बळावली होती.

2019 मध्ये मुख्यमंत्री झाले असते …

नोव्हेंबर 2019 मध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्या वेळी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी चालून आली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यास फारसे इच्छुक नव्हते त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा संजय राऊत या दोघांपैकी एकाला मुख्यमंत्री करण्यास उद्धव ठाकरे इच्छुक होते मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला आक्षेप घेत एवढे मोठे महाआघाडी सरकार चालवायचे तर त्यासाठी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री पद स्वीकारले पाहिजे असा आग्रह धरला आणि शरद पवार यांच्या आग्रहामुळे आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पद स्वीकारण्याची उद्धव ठाकरे यांच्यापुढे कोणताही पर्याय उरला नाही.


महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार, एकनाथ शिंदे गुजरातमध्ये; आघाडी सरकार अडचणीत