Mard: कोविड रुग्णसेवेसाठी निवासी डॉक्टरांना ठाकरे सरकार सव्वा लाख रुपये देणार

CM-Uddhav-Thackeary
पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टात राज्य शासन बाजू मांडणार

कोरोना महामारीच्या काळात दिवसरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर आपले कार्य बजावत होते. आता कोरोना रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय आणि पालिका महाविद्यालयातील निवास डॉक्टरांना ठाकरे सरकार प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये देणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर तातडीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. (Thackeray government give to corona warriors resident doctors 1 lakh 21 thousand rupees)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला. या निर्णयाप्रमाणे शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला १ लाख २१ हजार रुपये देण्यात येतील. तातडीने हा शासन निर्णय काढल्याबद्धल सेंट्रल मार्डतर्फे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.


हेही वाचा –  MPSC Exam 2021: एमपीएससीने राज्य सेवा परीक्षेच्या १०० जागा वाढवल्या, नवे परिपत्रक जाहीर