घरCORONA UPDATEअंतिम वर्षाच्या परिक्षा होणार नाहीतच; राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम

अंतिम वर्षाच्या परिक्षा होणार नाहीतच; राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम

Subscribe

कालच UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा होतील असा निर्णय दिला होता. मात्र आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांना पत्र लिहून परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचे पत्राद्वारे कळवले. विद्यार्थ्यांना जास्तीचे ग्रेड मिळवण्यासाठी परिक्षा ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचेही या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

उदय सामंत म्हणाले की, “देशातील मोठ्या आयआयटी संस्थांनी अंतिम वर्षाची अंतिम परिक्षा रद्द केली आहे. तसेच देशातील इतर राज्यांनी देखील वेगवेगळी भूमिका जाहीर केलेली आहे. त्यामुळे युजीसीने घेतलेला निर्णय हा बंधनकारक नसून ते केवळ एक सूचना आहे.”

- Advertisement -

Uday Samant letter 1

Uday Samant letter 2

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -