Cinema Halls And Theaters Guidelines: दोन डोस घेतलेल्या प्रेक्षकांनाच सिनेमागृहात प्रवेश, वाचा नियमावली

Thackeray Government Issue new Cinema Halls And Theaters Guidelines
Cinema Halls And Theaters Guidelines: दोन डोस घेतलेल्या प्रेक्षकांनाच सिनेमागृहात प्रवेश, वाचा नियमावली

राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना येत्या २२ ऑक्टोबर परवानगी देण्यात आल्यानंतर राज्य सरकारने मंगळवारी यासंदर्भात नियमावली जारी केली. या नियमावलीनुसार आरोग्य सेतू अँप डाउनलोड केलेल्या किंवा कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रेक्षकांनाच सिनेमागृहात प्रवेश दिला जाणार आहे. तर नाट्यगृहात बाल कलाकारांच्या व्यतिरिक्त सर्व कलाकार आणि कर्मचारी वर्गाचे संपूर्ण लसीकरण त्यातही दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्याना मुभा दिली जाणार आहे. चित्रपट आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने वापरावे लागणार आहे.

राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने आज चित्रपटगृह, नाट्यगृह आणि बंदिस्त सभागृहंसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. मुख्य म्हणजे, कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणीच चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यात कोरोनाची पकड सैल होऊ लागल्याने ‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ सप्टेंबरच्या बैठकीत घेतला होता. टास्कफोर्सशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला होता.

चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करण्यासाठी नियम घालून देण्यात आले असून नियमांचे पालन करणाऱ्यांविराधोत नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

नाट्यगृह आणि सिनेमागृहांसाठी नियमावली

 • प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी नाही. जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा.
 • कलाकार, कर्मचारीवृंद यांनी नियमितपणे तपासणी करावी.
 • कलाकार, कर्मचारीवृंद यांनी नियमितपणे तपासणी करावी.
 • मास्क, सॅनिटायजरचा वापर आवश्यक.
 • प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षेत भेटण्यास मज्जाव.

  केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई किटस परिधान करावे, आरोग्यसेतू अॅप बंधनकार.

 • कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
 • ५० टक्क्यांपेक्षा अधिक अधिक क्षमतेचा वापर करता येणार नाही. आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
 • चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी ऑडिटोरिअम, कॉमन एरिया आणि वेंटिग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक.
 • सिनेमा पाहणाऱ्या येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.
 • सिनेमागृहांमध्ये बाहेर पडत असताना गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मल्टीप्लेक्समध्ये अनेक सिनेमे वेगवेगळया पडद्यांवर दाखवले जातात. अशा वेळी मध्यंतर एकाच वेळी येणार नाही याची काळजी घेण्यात यावी जेणेकरुन प्रेक्षकांची गर्दी होणार नाही.
 • सिनेमागृहांमध्ये काम करणारे कर्मचारी यांचे लसीकरण आवश्यक आहे. मॉलमध्ये प्रवेशासाठी पूर्ण लसीकरण हे नियम ठरविण्यात आले असले तरी मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटगृहांच्या तिकिटावर मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल.
 • तिकीट खिडकीवर गर्दी होऊ नये. यासाठी डिजिटल पध्दतीने तिकीट बुकींगवर भर देण्यात यावा. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये तिकीट काढताना तिकीट खिडकीवर गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन आवश्यक तितक्या तिकीट खिडक्या उघडण्यात याव्यात.
 • सिनेमागृहांमधील प्रत्येक स्क्रिनिंग नंतर सॅनिटायझेशन करण्यात यावे. खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, कर्मचाऱ्यांचे बसण्याचे ठिकाणी, स्वच्छतागृहे यांची साफसफाई नियमितपणे करण्यात यावी.
 • सिनेमा सुरू होण्यापूर्वी जनहितार्थ कोविड नियमांची माहिती तसेच इतर आवश्यक माहिती ऑडिओ व्हिज्युअल क्लिप मधून देण्यात यावी. सिनेमागृहांमधील एअर कंडिशन २४ ते ३० सेल्सिअस टेपरेंचर इतका असावा.

हेही वाचा – Maharashtra New Guidelines: सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी राज्य सरकारची नवी नियमावली, वाचा संपूर्ण