Maharashtra Mini Lockdown: ठाकरे सरकारने काढले सुधारित आदेश; जिम, ब्युटी पार्लर्सबाबत नवे नियम काय?

Thackeray government revised COVID19 restrictions beauty saloons and gyms allowed to remain open with 50 percent capacity
Maharashtra Mini Lockdown: ठाकरे सरकारने काढले सुधारित आदेश; जिम, ब्युटी पार्लरबाबत नवे नियम काय?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला ओमिक्रॉन रुग्ण देखील वाढत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा काल, शनिवारी केली. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार, जिम, ब्युटी पार्लर्स उद्यापासून बंद करण्याचा आदेश दिला होता. परंतु आता ठाकरे सरकारने या आदेशात दुरुस्ती करून सुधारित आदेश जारी केला आहे. या नव्या सुधारित आदेशात जिम, ब्युटी पार्लर्स मिनी लॉकडाऊन दरम्यान सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

जिम, ब्युटी पार्लर्स पूर्णतः बंद करण्याचे आदेश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. कारण यापूर्वी राज्यातील पहिला, दुसऱ्या लाटेदरम्यान जिम, ब्युटी पार्लर्सचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ठाकरे सरकारने आता आपल्या नव्या आदेशात सुधारणा करून जिम आणि ब्युटी पार्लर्सना दिलासा दिला आहे. जिम, ब्युटी पार्लर्स ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. फक्त लसीचे दोन डोस झालेल्या कर्मचारी आणि व्यक्तींना जिम आणि ब्युटी पार्लर्समध्ये प्रवेश दिला जाणार आहेत. तसेच यावेळी मास्क शेवटपर्यंत वापर करणे बंधनकारक असणार आहे.

मिनी लॉकडाऊनदरम्यान आणखीन काय सुरू राहणार?

खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
शॉपिंग मॉल्स ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
नाट्यगृह आणि चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
दोन्ही डोस घेतलेल्यांना सार्वजनिक बसने वाहतूक करण्यास मुभा
सलून ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास मुभा


हेही वाचा – Maharashtra Restriction: राज्यातील दारू, वाईन शॉप बंद होणार का?, आरोग्यमंत्री टोपे म्हणतात…