Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महाविकास आघाडीतील तिसरा राजीनामा कोणाचा ? गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले...

महाविकास आघाडीतील तिसरा राजीनामा कोणाचा ? गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले…

Related Story

- Advertisement -

दिलीप वळसे पाटील यांनी आज राज्याच्या गृहमंत्री पदाचा पदभार स्विकारला. गृहविभागाचा मुकुट हा जरी काटेरी मुकुट असला तरीही गृह विभागात दैनंदिन गोष्टी घडतात. त्यामुळे गृह विभाग हा अत्यंत आव्हानात्मक असा विभाग असल्याची कबुली दिलीप वळसे पाटील यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अत्यंत कमी कालावधीमध्ये आणि अचानकपणे पक्षाकडून मला या पदाचा पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या विभागाचा अवाका पाहता मला अभ्यासासाठी फारसा कालावधी मिळालेला नाही. अधिक सविस्तरपणे हा विभाग अभ्यासलेला नाही, पण जिथे दुरूस्त्या गरजेच्या आहेत, तिथे नक्कीच दुरूस्ती करू असेही आश्वासन त्यांनी पत्रकार परिषदेत दिले. भाजपकडून महाविकास आघाडीवर होणाऱ्या आरोपांवरही त्यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड अशी उत्तरे दिली. दरम्यान महाविकास आघाडीत तिसरा राजीनामा कोणाचा या प्रश्नावरही दिलीप वळसे पाटील यांनी मोजक्या आणि नेमक्या शब्दात उत्तर दिले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर उच्च न्यायालयाने आता सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गृहमंत्री पदाचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, उद्धव, अजित , जयंत पाटील, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केला. विश्वासाने जबाबदारी टाकलेली आहे आणि ती पार पाडायची आहे असेही ते म्हणाले. गृह विभागातील अतिशय अवघड आणि चॅलेजिंग काळ असल्याचे गृहमंत्री म्हणाले. कोरोनामुळे सर्व पोलिस फोर्स रस्त्यावर फिल्डवर कार्यरत आहे. पोलिस दलाचे काम कायदा आणि सुव्यवस्था राखणे आहेच, परंतु कोरोना काळात बंधने, अंमलबजावणी करणे यशस्वीपणे पोलिस विभागाकडे आहे. गुढीपाडवा, रमजानची सुरूवात, आंबेडकर, रामनवमी, महावीर जयंती आहे, दिवस महत्वाचे प्रत्येक धर्मियांच्या दृष्टीने महत्वाचे असे दिवस आहेत. पण याचवेळी प्रत्येक वर्गाच्या वेगवेगळ्या अपेक्षा राहतात. या महिन्यात आणखी चॅलेंजिंग परिस्थिती असणार आहे. पोलिस दलाबद्दल विश्वास वाटला पाहिजे अशी प्रतिमा निर्माण करणे हेदेखील आमच्यासमोर आव्हान असणार आहे.

- Advertisement -

सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून गृह विभाग चालवण्याचा आमचा प्रयत्न राहील. आवश्यक आजीमाजी वरिष्ठ पोलिस अधिकारी सल्ला घेण्याचा प्रयत्न असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पोलिस दलाचे सक्षमीकरण करणे महत्वाची बाब आहे, त्यादृष्टीकोनातून पावले टाकणे आवश्यक राहील. स्वच्छ प्रशासन देण्यासाठी प्रयत्न राहील, प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही अशीही कबुली त्यांनी यावेळी दिली. प्रस्तावित शक्ती कायदा, पोलिस भरती गतिमान करणे, पोलिस हाऊंसिंग अंतर्गत घरे बांधणे या गोष्टी आगामी कालावधीत करायच्या आहेत.

भाजपकडून नवीन वसुली मंत्री कोण असा सवाल केला जात आहे, असाही प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. या प्रश्नावरही अतिशय संयमी असेल उत्तर गृहमंत्र्यांनी दिले. पण गृहमंत्री म्हणून मी अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक कारभार देणार असल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली. तर महाविकास आघाडीतीली तिसरा राजीनामा कोणाचा या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. याआधीही भाजपच्या मंत्र्यांवर आरोप झाले आहेत. काय बोलायचे, काय आरोप करायचे हा विरोधक म्हणून त्यांचा प्रश्न आहे.

आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

- Advertisement -

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या प्रकरणात हायकोर्टाने निर्णय दिले आहे. या प्रकरणात चौकशी सुरू, एनआयए, सीबीआय चौकशी सुरू करण्यासाठी जे आदेश दिले आहेत त्यामध्ये राज्य सरकारचे सहकार्य राहील. उच्च न्यायालयाचा जो निकाल आला आहे, त्या निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रिम कोर्टात आव्हान देणार आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


 

- Advertisement -