राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

mantralay

राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या पुन्हा एकदा बदल्या ठाकरे सरकारकडून करण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने राज्यात चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये मनिषा वर्मा या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची बदली ही प्रधान सचिव म्हणून कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात करण्यात आली आहे. आणखी तीन सनदी अधिकाऱ्यांची बदलीही ठाकरे सरकारकडून करण्यात आली आहे.

राज्यात चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आल्या. या बदल्यांमध्ये मनिषा वर्मा या १९९३ च्या बॅचच्या सनदी अधिकाऱ्याची बदली ही मंत्रालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे मुंबईतील फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी होती. तर २०१२ च्या बॅचच्या राधाबिनोद शर्मा यांच्याकडे हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी होती, त्यांना आता बीड जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी असलेल्या डॉ एम एम गोंदावले यांची बदली सह व्यवस्थापकीय संचालक महावितरण (औरंगाबाद) म्हणून करण्यात आली आहे. गोंदावले हे २०१५ बॅचचे सनदी अधिकारी आहेत. २०१५ च्या सनदी अधिकारी असलेले नरेश गटने यांच्याकडे जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. त्यांना औरंगाबाद जिल्हापरिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.