घरताज्या घडामोडीपूरग्रस्तांना प्रति कुटुंब १० हजार रोख तर ५ हजार रुपयांचे धान्य -...

पूरग्रस्तांना प्रति कुटुंब १० हजार रोख तर ५ हजार रुपयांचे धान्य – ठाकरे सरकारचा निर्णय

Subscribe

पूरामुळे नुकसान झालेल्या घरांसाठीही नागरिकांना मदत करणार - विजय वडेट्टीवार

राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकार तातडीची मदत देणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे नुकसान झालं आहे त्यांना १० हजार रुपये रोख तर ५ रुपयांचे धान्य देऊन मदत करणार असल्याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच ज्यांच्या घराची पडझड झाली आहे त्यांनाही मदत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

मदत व पुनर्वनसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, प्रति कुटुंब १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुराच्या पाण्यात जी घरे गेली किंवा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना प्रति कुटुंब १० हजार रुपये नगदी रुपाने तर ५ हजार रुपये धान्य रुपात देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच ज्या घरांचे नुकसान झाले आहे अशा कुटुंबांनाही मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

- Advertisement -

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. यामध्ये १ लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून तर ४ लाख रुपये एसडीआरएफमधून असे मिळून पाच लाख रुपये राज्य सरकारने द्यायचा विचार केला आहे.

पाण्याच्या विसर्गामुळे धोका कमी झाला

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आहे. यावेळी कोयनानगरमध्ये असताना माध्यमांशी संवाद साधला आहे. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, यंदा राज्यात सर्व रेकॉर्ड मोडणारा पाऊस पडला आहे. कोयना परिसरात ४८ तासात १ हजार ७२ मिली पावसाची नोंद झाली आहे. आपलं नशीब आणि मागच्या वर्षीच्या पावसाचा अनुभव घेऊन वरिष्ठ मंडळाची बैठक घेऊन यावर दरवर्षी येणारा धोका लक्षात घेऊन उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये जलसंपदा विभागाने महत्वाची भूमिका बजावली आहे. नद्यांच्या उपनद्यांची वरची धरणं ही ५० टक्क्यांपेक्षा भरु नये असा प्रस्ताव दिला होता. त्याबरोबर खालचं जे अलमट्टी धरण आहे ज्याच्यामुळे नेहमी पूर येतो त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग १.५० लाखांवरुन तो ३ लाखांवर पोहोचवला आणि धरणामध्ये स्कोप ठेवला गेला यामुळे थोडं संकट कमी झालं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -