घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार, पुणतांब्यात पुन्हा शेतकरी एल्गार

ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार, पुणतांब्यात पुन्हा शेतकरी एल्गार

Subscribe

३ जूनच्या बैठकीत ठरणार आंदोलनाची पुढची दिशा

अहमदनगर : शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुन्हा एकदा पुणतांब्यातून शेतकरी आंदोलनाची हाक दिली जाणार आहे. पक्षभेद बाजूला सारून सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी एकत्र येतात. २३ मे रोजी याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

२०१७ सालच्या शेतकरी संपाची हाक याच पुणतांबा गावातून देण्यात आली होती. या संपाची संपूर्ण देशभरात चर्चा झाली होती. १६ दिवस हा संप चालला होता. पुणतांब्यात शेतकरी एकवटले होते. म्हणूनच येथील ग्रामसभेत ठरणार्‍या आंदोलनाला विशेष महत्व आहे. शेतकर्‍यांच्या कोणत्या प्रश्नांचा त्यामध्ये समावेश असावा, नेमके कोणत्या अनुषंगाने आंदोलन पार पडणार याबाबत पुणतांबा येथे बैठक पार पडली.

- Advertisement -

सरकारच्या धोरणांवर शेतकरी नाराज आहेत. खासकरून महाराष्ट्रात ऊस, कांदा, आणि विजेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात लाखो टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. कांदा कवडमोल झाला आहे. तर फळपिके फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नी ऐतिहासिक अशा शेतकरी संपाची मशाल पेटवणार्‍या पुणतांबा गावात पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ग्रामपंचायत समोर किसान क्रांतीचे पदाधिकारी, शेतकरी नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच शेतकरी यांची बैठक पार पडली.

शेतकर्‍यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर आता सोमवारी (दि.२३ मे) पुणतांबा गावात विशेष ग्रामसभेत शेतकरी आंदोलनाबाबत पुढची दिशा ठरणार आहे. शेतकरी पुन्हा एकदा संपावर जाणार का? की राज्यव्यापी आंदोलन करणार याबाबत ग्रामसभेत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेतेही एकत्र येत आहेत. शेतकर्‍यांच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यात शिल्लक ऊसाला एकरी दोन लाख रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. साखर कारखान्यात घातलेल्या ऊसाला प्रतिटन एक हजार अनुदान द्यावे, शेतकर्‍यांना सोलर पंपासाठी अनुदान द्यावे आणि शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या उध्दव ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -