घरताज्या घडामोडीचिंचवड पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून 'त्या' शिवसैनिकांची हकालपट्टी; वाचा नेमके प्रकरण काय?

चिंचवड पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून ‘त्या’ शिवसैनिकांची हकालपट्टी; वाचा नेमके प्रकरण काय?

Subscribe

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. एकीकडे या निवडणुकीत आपला उमेदवार विजयी होण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवाराचा प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेल्या राहुल कलाटे यांना मदत करणाऱ्या शिवसैनिकांवर उद्धव ठाकरे यांनी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. (thackeray group 8 party workers suspended in chinchwad by election)

चिंचवड पोटनिवडणुकीत पक्षाच्या आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला संघटिका अनिता तुतारे शहर संघटिका रजनी वाघ, विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर आणि रवि घटकर हे पदाधिकारी पक्षादेशाविरोधात काम करत होते. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली. शुक्रवारी शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांची यादी त्यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शहराध्यक्ष सचिन भोसले आणि जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी ही मोठी कारवाई केली आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे हे आज चिंचवडमध्ये नाना काटे यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो करणार आहेत. त्यापूर्वीच पक्षाने चिंचवडमध्ये ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेल्या राहुल कलाटे यांच्यात मुख्य लढत होत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना मदत करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना मदत करताना काही शिवसैनिक दोषी असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. चिंचवड पोटनिवडणूक ही महाविकास आघाडीने अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. त्यात राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीचेच टेन्शन वाढवले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हैदराबादेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -