Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रThackeray Group : आदित्य ठाकरे विधिमंडळाच्या गटनेतेपदी, तर भास्कर जाधव विधानसभेचे गटनेते...

Thackeray Group : आदित्य ठाकरे विधिमंडळाच्या गटनेतेपदी, तर भास्कर जाधव विधानसभेचे गटनेते अन् सुनील प्रभू प्रतोदच

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विजयी उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्षाचे प्रतोद, विधानसभेचा गटनेता आणि विधिमंडळाचा गटनेता यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांना मोठा धक्का बसला आहे. कारण मविआला 288 पैकी केवळ 46 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे मविआतील नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे आहे तेही आमदार फुटू नये याकरिता मविआतील पक्षांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ज्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विजयी उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्षाचे प्रतोद, विधानसभेचा गटनेता आणि विधिमंडळाचा गटनेता यांची निवड करण्यात आली आहे. (Thackeray Group Aaditya Thackeray as Group Leader of Legislature, Bhaskar Jadhav as Leader of Legislative Assembly and Sunil Prabhu as Pratod)

मातोश्री येथे सोमवारी (ता. 25 नोव्हेंबर) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना नेते व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. त्यावेळी एकमताने युवानेते आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभा आणि विधानपरिषदेच्या म्हणजेच विधिमंडळांच्या गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याशिवाय तब्बल सातव्यांदा आमदार झालेले ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्याकडे विधानसभेच्या गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याशिवाय, आमदार सुनील प्रभू यांच्याकडील प्रतोदपद कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे, आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा, तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना युबीटीतील निर्णय घेण्यात येतील.

- Advertisement -

हेही वाचा… SS UBT : विजयाचे देणे नम्रतेने पेलवता येईल काय? ठाकरे गटाचा नवनिर्वाचित आमदारांना प्रश्न

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल अनाकलनीय आहेत, यावर सगळ्यांचेच एकमत बनले आहे. या सगळ्यात स्वतः भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीसदेखील आहेत. भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांना मिळालेल्या छप्परफाड जागा पाहून आपल्यालाही आश्चर्याचा धक्काच बसल्याचे फडणवीस यांनी मान्य केले. महाराष्ट्रातील ‘विजय’ हा महायुतीसह सगळ्यांसाठी अभूतपूर्व आहे, पण विजयाचे हे देणे विजयवीरांना नम्रतेने पेलवता येईल काय? असा थेट सवाल ठाकरे गटाने केला आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -