शिवसेना-धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे जाताच दादरमध्ये ठाकरे गट आक्रमक; चौकात झळकवले बॅनर

Thackeray group aggressive in Dadar due to ec Shiv Sena Dhanushya arrow symbol give Shinde group banner displayed in dadar

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आता ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आता ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून काल रात्रीपासून दादर परिसरात चौकाचौकात ही लोकशाहीची हत्या असल्याचं बॅनर झळवले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसतायत, एकीकडे शिंदे गटाकडून सेलिब्रेशन सुरु आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाने आंदोलन केलं आहे. अशात दादर परिसरात आज ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी चौका चौकात पोस्टर लावून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. ही लोकशाहीची हत्या आणि हुकूमशाहीकडे पडलेले पहिले पाऊल, अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत. सध्या मुंबई पोलिसांकडून ही पोस्टर हटवण्याचे काम सुरु आहे.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर गेल्या वर्षी जूनमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाने पक्षचिन्ह आणि नावावर दावा केला. यानंतर दोन्ही गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेत याचिका दाखल केली. यावेळी अंधेरी पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट खरी शिवसेना असल्याचा निकाल करत, त्यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल केलं. यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातून आता शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव निसटलं आहे.


गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा