घरमहाराष्ट्रखारघर दुर्घटनाप्रकरणी ठाकरे गट आक्रमक, संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी

खारघर दुर्घटनाप्रकरणी ठाकरे गट आक्रमक, संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी

Subscribe

खारघर येथे १५ एप्रिलला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमात उष्माघातामुळे एकूण १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. ज्यानंतर राज्यातील विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

खारघर येथे १५ एप्रिलला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमात उष्माघातामुळे एकूण १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. ज्यानंतर राज्यातील विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समितीची देखील नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधा पक्षनेते अजित पवार यांनी याबाबततचे पत्र देखील राज्यपालांना पाठवले होते. तर त्यापाठोपाठ काँग्रेसनेही (Congress) शिंदे-फडणवीस सरकारवर ठपका ठेवला आहे. अवघ्या चार दिवसांत यासंदर्भातील टेंडर काढण्यात आले असून याप्रकरणी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

खारघरची घटना दुर्दैवी नसून शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातबाजीच्या हव्यासामुळे घडलेली घटना आहे. जवळच्या कंपनीला कार्यक्रमाचे कंत्राट देऊन शिंदे सरकारने जाणीवपूर्वक लोकांचा जीव धोक्यात घातला. लोकांचा जीव जाण्याला सरकारच जबाबदार आहे, असा थेट आरोप काँग्रेसने केला असून यासंदर्भाती एक व्हिडीओ देखील काँग्रेसने शेअर केला आहे.

- Advertisement -

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने कारवाईची मागणी केल्यानंतर आता ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाकडून राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यात आली. तसेच या प्रकरणाचे निवेदन देखील राज्यपालांना देण्यात आले आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांच्याकडून देण्यात आली आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार रमेश प्रभू, खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आमदार सचिन अहिर तसेच ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

पोलिसांवर कारवाईची मागणी
या प्रकरणी एका राजकीय पक्षाने किंवा कोणत्याही संघटनेने 100, 200 जणांचा जरी कार्यक्रम आयोजित केला तर परवानगी देताना पोलीस सांगत असतात, असे यावेळी अंबादास दानवे यांच्याकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमातील सगळ्या घटनेची जबाबदारी सर्वस्वी तुमची असेल, जर अशी घटना एखाद्या राजकीय कार्यक्रमात, एखाद्या लग्न कार्यात घडली असती, तर सरकारने काय पावले उचलली असती, असा प्रश्न उपस्थित करत दानवेंनी आपला रोष व्यक्त केला.

- Advertisement -

त्यामुळे राज्यपालांना अधिकृतरित्या राज्य सरकारने जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाची कार्यक्रमपत्रिका सादर केली आहे. निवेदन सादर केलेले आहे आणि राज्यपालांनी ताबडतोब या घटनेची नोंद पोलिसांकडे अपमृत्यू होण्याची किमान नोंद करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आलेली आहे. तसेच संबंधित पोलीस आयुक्त, उपायुक्त, सिनीअर पीआय यांची सुद्धा या घटनेत जबाबदारी होती. पण त्यांनी ही जबाबदारी घेतली नसेल तर किमान त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, कारण जबाबदारी पार पाडण्यास ते अक्षम ठरले आहेत, असे सांगत अंबादास दानवे यांनी या प्रकरणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आलेल्या मागणीबाबत माहिती दिली.


हेही वाचा – केसीआर यांची आज महाराष्ट्रात तिसरी रॅली; मराठवाड्यात पाय रोवण्याचा प्रयत्न?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -