घरमहाराष्ट्रShinde vs Thackeray : ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला? संजय शिरसाटांचा...

Shinde vs Thackeray : ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला? संजय शिरसाटांचा दावा

Subscribe

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरे यांना 2021 मध्ये मोठा धक्का दिला. त्यांच्यासोबत अनेक आमदार आणि खासदार हे शिवसेनेच्या बाहेर पडले. तेव्हापासून ते आजतागायत उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे. काही दिवसांच्या फरकाने नेहमीच पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा ठाकरे गटातील नेते हे शिवसेनेत प्रवेश करताना दिसून येत आहेत. अशातच आता ठाकरे गटातील आणखी एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हेच ते आमदार असण्याची शक्यताही आता व्यक्त करण्यात आली आहे. (Thackeray group another MLA join CM Eknath Shinde Shinde Shiv Sena, claims Sanjay Shirsat)

हेही वाचा… Sanjay Raut : “ते लढतील व जिंकतील” ईडीच्या निशाण्यावरील वायकरांसाठी राऊतांची विशेष पोस्ट

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज (ता. 08 फेब्रुवारी) रवींद्र वायकर यांच्यावर ठाकरे गट सोडण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा केला. त्यांनी एक्स सोशल मीडिया साइटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली. ज्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. पंरतु, संजय राऊत यांच्या या विधानाला आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर रवींद्र वायकर यांच्यासारखे अनेक जण हे आगामी निवडणुकांची आचारसंहिता लागण्याआधी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावाही संजय शिरसाटांनी केला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकूण 56 आमदार विजयी होऊन आले होते. परंतु एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर केवळ 15 आमदार ठाकरे गटात राहिले आहेत. परंतु, आता 15 आमदारांमधील आता आणखी एक आमदार शिवसेनेच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा करण्यात येत आहे. पण संजय राऊत यांनी केलेल्या पोस्टमुळे तो आमदार इतर कोणीही नसून रवींद्र वायकर असल्याचेही बोलले जात आहे. तर जो कोणता आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहे, त्या आमदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसा शब्द दिल्याचेही बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे, असे संबंधित आमदाराने एकनाथ शिंदे यांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या आमदारासोबत ठाकरे गटाचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

काय म्हणाले संजय शिरसाट?

संजय राऊत यांनी रवींद्र वायकर यांच्याविषयी पोस्ट केल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी त्याबाबत आरले मत व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीशी राऊतांच्या पोस्टबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत यांच्या सकाळच्या बडबडीला सगळेजण कंटाळले आहेत. त्यामुळे ते आपल्या मर्जीने बाहेर पडत आहेत. तर रवींद्र वायकरांवर दबाव टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण शिवसैनिक हे घाबरत नसतात. त्यातही रवींद्र वायकर हे काही भीत्रे नाही. राहिला ईडी चौकशीचा प्रश्न तर ईडीच्या गळाला अनेक मोठे मासे लागले आहेत, ज्यांची नावे लवकरच समोर येतील, असा खळबळजनक दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. तर रवींद्र वायकर यांचा प्रवेश कधी होणार याबाबत कोणतीही स्पष्टता शिरसाटांकडून देण्यात आलेली नसली तरी हा प्रवेश लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -