घरमहाराष्ट्रElectricity tariff hike : सामान्यांच्या मासिक खर्चात दोन शून्यांची वाढ केली, ठाकरे...

Electricity tariff hike : सामान्यांच्या मासिक खर्चात दोन शून्यांची वाढ केली, ठाकरे गटाची भाजपावर टीका

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या त्यांच्या प्रत्येक जाहीर सभेत ‘पंतप्रधान सूर्योदय योजने’चे गोडवे गात आहेत. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना कशी क्रांतिकारी आहे, त्यामुळे सामान्यांचे वीज बिल कसे शून्यावर येईल, अशी स्वप्ने दाखवीत आहेत. वीज बिल शून्य व्हायचे तेव्हा होईल, परंतु आता तुम्ही सामान्यांच्या मासिक खर्चात दोन शून्यांची वाढ केली आहे, या वास्तवाचे काय? अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024: आनंदराज आंबेडकरांकडून उमेदवारी मागे; वंचितला पाठिंबा देणार

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी आश्वासनांचे रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडत आहेत. विकासकामांचे पोकळ ढोल वाजवीत आहेत. मागील दहा वर्षांत इतर क्षेत्रांप्रमाणेच ऊर्जा क्षेत्रातदेखील देशाने कशी क्रांती केली, याचेही दाखले ही मंडळी देत आहेत. पण मग ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सामान्य जनतेला वीज दरवाढीचा शॉक देण्याची आफत का आली? या प्रश्नावर मात्र या मंडळींची दातखिळी बसली आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून सुनावले आहे

मिंधे सरकारने या दरवाढीचा मुहूर्तही काढला तो 1 एप्रिलचा. यंदा मार्चपासूनच उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. त्यात एप्रिल आणि मे महिन्यात तीव्र उष्णतेच्या लाटेला तोंड द्यावे लागेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. म्हणजे सामान्य माणसाला दरवाढीचा बोजा सहन करून विजेचा जास्तीचा वापर करण्याशिवाय गत्यंतरच उरलेले नाही, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : …शिवाजी महाराजांनी दृष्टांत दिला; बारामतीचा पेच पुन्हा वाढला?

घरगुती वीज ग्राहकांवर वीज बिलाचा बोजा दरमहा 10 ते 65 रुपयांनी वाढणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही दरवाढ 20 ते 30 पैसे प्रति युनिट असेल. व्यावसायिक, औद्योगिक वीज ग्राहक, रुग्णालये यांनादेखील या दरवाढीचा फटका बसणार आहे. रस्त्यांवरील पथदिव्यांसाठी आता 129 रुपयांऐवजी 142 रुपये आकारले जाणार असल्याने त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करवृद्धीमध्ये होणार हे उघड आहे. म्हणजे घरगुती वीजवापरासह सर्वच क्षेत्रांना या दरवाढीचा तडाखा बसणार आहे आणि आधीच महागाईच्या वणव्यात होरपळणारा सामान्य माणूस या वीज दरवाढीने पुरताच भाजून निघणार आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

इंधन खरेदीसाठी जास्त खर्च येत असल्याने वीज दरवाढीशिवाय पर्याय नव्हता, अशी बतावणी सरकार आणि महावितरण करीत आहे. प्रश्न इतकाच आहे की, ऐन उन्हाळ्यात हा दरवाढीचा चटका जनतेला देण्याएवढी तुम्हाला काय ‘इमर्जन्सी’ होती? उन्हाळ्यात असेही सर्वच जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळफळावळ यांचे दर वाढलेले असतात. इतर खर्चदेखील वाढलेला असतो. त्यात वीज दरवाढीचा बोजा सामान्यांच्या माथी मारून तुम्हाला कुठला आनंद मिळाला? वाढीव स्थिर आकाराला इंधन अधिभार जोडला तर ही दरवाढ 10 टक्क्यांपर्यंत जाईल, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – Lok Sabha : ठाकरेंचा प्रस्ताव फेटाळत राजू शेट्टींकडून ‘एकला चलो रे’चा नारा; कारणंही स्पष्ट केलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -