घरमहाराष्ट्रठाकरे गटाने पक्षाच्या नाव आणि चिन्हासाठी पाठवले 'हे' तीन पर्याय; निवडणूक आयोगाच्या...

ठाकरे गटाने पक्षाच्या नाव आणि चिन्हासाठी पाठवले ‘हे’ तीन पर्याय; निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

Subscribe

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपुरता अंतरिम आदेश देण्यात आले आहेत. या निवणडणुकीसाठी पक्षांनी नाव आणि चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करावेत. त्यानुसार, निवडणूक आयोग त्यातील एका पर्यायावर शिक्कामोर्तब करणार आहे. 

मुंबई – गेल्या चार महिन्यांमध्ये राज्यातील राजकारणात अनाकलनीय घटना घडत आहेत. एका रात्रीत सत्तांतर घडून आलं. मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली. मात्र, या सत्तेवरूनच पेच निर्माण झालाय. सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे होता. खरी शिवसेना कोण हे निवडणूक आयोगाला ठरवता न आल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. यामुळे नाव आणि चिन्हाचा वापर शिंदे आणि ठाकरे गटाला करता येणार नाही. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी तीन चिन्ह आणि पक्षाच्या नावाचे पर्याय निवडणूक आयोगासमोर आज दिले आहेत.

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मैदानात; बैठकीत ठरवली रणनीती

- Advertisement -

सोमवारी, १० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत नाव आणि चिन्हासाठी पर्याय देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय पाठवले आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली. त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल असे तीन पर्याय चिन्हासाठी दिले आहेत. तर, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे तीन पर्याय पक्षाच्या नावासाठी देण्यात आले आहेत.

हेही वाचा – ‘चिन्ह गोठवलंय पण रक्त पेटवलंय’; ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा

- Advertisement -

निवडणूक आयोगाने काल दिवस संपता संपता रात्री पावणे दहाच्या सुमारास पक्ष आणि चिन्हाबाबतचा निकाल कळवला. शिंदे आणि ठाकर गटाने कागदपत्रे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाची दिल्लीत चार तास बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. हा निकाल सोमवारपर्यंत हाती येईल असं वाटत असतानाच रात्री पावणेदहाच्या सुमारास निवडणूक आयोगाने पत्रक जारी करून आपला निकाल कळवला. खरी शिवसेना कोण हे ठरवणं सध्या शक्य नसल्याने येत्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आल्याचं या पत्रकाद्वारे सांगण्यात आलं. यानुसार, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपुरता अंतरिम आदेश देण्यात आले आहेत. या निवणडणुकीसाठी पक्षांनी नाव आणि चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करावेत. त्यानुसार, निवडणूक आयोग त्यातील एका पर्यायावर शिक्कामोर्तब करणार आहे.

हेही वाचा – खेळलेला डाव कधीही त्यांच्यावर…; राष्ट्रवादीने भाजपला सुनावले

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -